वडनेर : अमरावती येथील संत गाडगे बाबा मंदिर सभागृहात २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता प्रतिभा साहित्य संघ, महाराष्ट्र जिल्हा व शहर कार्यकारीणीतर्फे प्रतिभावंतांचा साहित्य संवाद कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी नगर येथील नामवंत साहित्यिक कविवर्य डाॅ. संजय बोरूडे हे आहेत. स्वागताध्यक्षपदी जिल्हा कार्यकारिणीचे सचिव नितीन पविञकार यांची निवड करण्यात आली आहे.
"राजकारण हे समाज परिवर्तनाचं प्रभावी माध्यम असून या दोहोंचे प्रतिबिंब साहित्यिकांच्या साहित्यात उमटत असतात. त्या करीता प्रतिभा साहित्य संवाद समारंभा करीता स्थानिक साहित्यिक मंडळी सोबतच महाराष्ट्र राज्याच्या तसेच अमरावती जिल्ह्याच्या विकासात मौलिक कामगिरी करणा-या आजी माजी राजकीय पदाधिकारी यांनाही सादर निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताध्यक्ष मंगेश वानखडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र ठाकरे, जिल्हा सचिव नितीन पविञकार यांनी नुकत्याच पार पडलेल्या नियोजन सभेत दिली.
यावेळी अध्यक्ष विठ्ठल कुलट, सचिव विजय सोसे, अकोला जिल्हाध्यक्ष अरूण काकड, शहर अध्यक्ष संदीप देशमुख, सचिव सूर्यकांत बाजड, उपाध्यक्ष व लेखक गजानन सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या समारंभात कांचन मुरके यांच्या तसेच संदीप देशमुख यांच्या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा तसेच संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कुलट यांच्या 'सत्तेत होरपळणारी सत्यवान माणसं' या काव्यसंग्रहाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
यावेळी केंद्रीय कार्यकारीणी सचिव विजय सोसे हे हितगुज साधतील. प्रकट मुलाखत, नवनियुक्त कार्यकारीणीचा सत्कार आणि कविसंमेलन असे या कार्यक्रमाचे स्वरूप राहणार आहे.
प्रतिभा साहित्य संघातर्फे या दोन दशकात १४ राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन पार पडले आहेत. यामध्ये साहित्य, सांस्कृतिक, शिक्षण, शेती, सामाजिक तथा पर्यावरण क्षेञात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्ती व संस्थांना लोककवी डाॅ. विठ्ठल वाघ तिफन पुरस्कार, स्व.बापूराव पाटील तुरखडे उदीम पुरस्कार, डाॅ. आ. ह. साळुंखे प्रतिभा गौरव पुरस्कार तसेच प्रतिभा कर्मदीप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Post a Comment