हंगा सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी संताराम दळवी तर उपाध्यक्षपदी मनोहर नगरे यांची बिनविरोध निवड !


पारनेर : आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शना खाली त्यांच्या मूळ गावी हंगा येथे सेवा सोसायटीच्या अध्यक्ष व  उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली.

जिल्हा परिषद सदस्या राणीताई निलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अध्यक्षपदासाठी संताराम तुकाराम दळवी यांच्या नावाची सूचना दशरथ बबन काळे यांनी मांडली. बाबासाहेब साठे यांनी अनुमोदन दिले .

तसेच उपाध्यक्षपदासाठी मनोहर भिमाजी नगरे यांच्या नावाची सूचना जया तुकाराम नगरे यांनी मांडली. त्यास  राजेंद्र सखाराम शिंदे यांनी अनुमोदन दिले. 

या दोन्ही पदाची निवड बिनविरोध करण्यात आली. सेवा सोसायटीचे सचिव चंदन बापू भाऊसाहेब व सहाय्यक भाऊ मोकाते यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

सहकार अधिकारी वर्ग- दोन पारनेरचे के. के. आव्हाड यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. 

नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्षंचे आमदार निलेश लंके यांनी अभिनंदन केले. हंगा गावची सेवा सोसायटी ही मतदार संघात पारदर्शक व आर्थिक सुबकत्ता युक्त करत, जिल्ह्यात सेवा सोसायटीचे एक वेगळेपण निर्माण करावे अशा सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

या निवड प्रक्रियेत सहभाग नोंदवणारे जिल्हा परिषद सदस्या तथा जिल्हा नियोजन कमिटी सदस्या राणीताई निलेश लंके यांच्यासह ज्ञानदेव लंके, माजी अध्यक्ष बाबासाहेब साठे, राजेंद्र शिंदे, प्रा. संताराम दळवी, सोपान मोकाते, मनोहर नगरे, बबन थोरात, दीपक लंके, चंद्रकांत मोढवे, मारुती शिंदे बाळासाहेब दळवी, वनिता शिंदे, सुहास नगरे, मंगल दळवी, भाऊ साठे, बाळासाहेब शिंदे, संदीप शिंदे, सतीश दळवी आदी   उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post