पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोव्हिड योद्धांचा सन्मान


पाथर्डी : सेवा व समर्पण या संकल्पनेेतून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्त तालुक्यात गेल्या दीड वर्षापासून रात्रदिंवस काम करणारे आरोग्य, पोलिस, महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा भाजपा युवा मोर्चातर्फे केलेला सन्मान म्हणजे त्यांनी संकटकाळात केलेल्या कामाची ही पावती आहे आहे, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. 

तालुक्यातील माळीबाभुळगाव येथे भाजपा युवा मोर्चा व राजमुद्रा ग्रुपतर्फे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोव्हिड योद्धांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.  त्यावेळी त्या बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी भाजापाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर होते. पंचायत समिती सभापती सुनिता दौंड, नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, ज्येष्ठ भाजपा नेते अशोक चोरमले, पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, उपनिरिक्षक श्रीकांत डांगे, वृध्देश्वरचे उपाध्यक्ष रामकिसन काकडे, पंचायत समिती सदस्य विष्णूपंत अकोलकर, सुनिल परदेशी, एकनाथ आटकर, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे, पुरुषोत्तम आठरे, भाजपाचे शहराध्यक्ष अजय भंडारी आदी उपस्थित होते.

राजळे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या चांगल्या योग्य नियोजनामुळे जगात सर्वाधिक लसीकरण भारतात झाले आहे. सध्याही वेगाने सुरूच आहे. त्यामुळे कोरोनाची साथ आटोक्यात येण्यास मदत होते आहे. मोदींचे विचार व केंद्र सरकारच्या विविध योजना तळागाळात पर्यंत पोहचविणे हीच त्यांना वाढदिवासाची खरी भेट ठरेल.

यावेळी सरपंच अनिल तिजोरे, मढी देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड, भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा काशीबाई गोल्हार, नगरसेवक बबन बुचकुल, मंगल कोकाटे, राहुल कारखेले, डॉ. नवनाथ आव्हाड, बाळासाहेब गोल्हार, आदिनाथ धायतडक, सचिन पालवे, सुरेख कुलथे, भगवान सानप, सचिन बर्डे, डॉ. रेखा सानप, मुकुंद लोहीया, तानाजी जाधव, रविंद्र वायकर, रविंद्र आरोळे, जमीर आतार आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष  सचिन वायकर यांनी केले.  आर. बी. शेख यांनी सूत्रसंचालन तर अक्षय काळे यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post