पारनेर : आमच्या भावाला जनतेने वर्गणी विजयी केले. मतदारांनी दिलेल्या संधीचे सोने करीत ते जनतेची सेवा करीत आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केले.
निघोज येथील एक कोटीच्या खर्चाची अभ्यासिका तसेच इतर विविध विकास कामांचे चाकणकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले होत्या.
या प्रसंगी आमदार नीलेश लंके, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड , माजी आमदार पोपटराव गावडे, कन्हैय्याचे अध्यक्ष शांताराम लंके, जिल्हा परिषद सदस्य पांडूरंग पवार, सरपंच चित्रा सचिन वराळ , युवतीच्या जिल्हाध्यक्ष राजश्री कोठावळे, अशोक सावंत, प्रभाकर कवाद, ठकाराम लंके, सोमनाथ वरखडे, वसंत कवाद , बाबाजी लंके, बाळासाहेब लंके आदी यावेळी उपस्थित होते.
चाकणकर म्हणाल्या की, सामान्य जनतेच्या पाठिंब्यामुळे आमदार निलेश लंके विधानसभेची निवडणूक ६० हजार मतांनी जिंकले. कोरोनाच्या संकटातही ते मतदारसंघात कोटयावधी रूपयांची विकास कामे करीत आहेत. त्यांच्या विकास कामांचा सपाटा पाहिला तर पुढील निवडणुकीत त्यांचा एक लाख मतांनी विजयी होतील.
आमच्या भावाला जनतेने वर्गणी करून गेल्या विधानसभा निवडणुकीत साठ हजार मतांनी विजयी केले. मतदारांनी दिलेल्या संधीचे सोने करीत ते जनतेची सेवा करीत आहेत. कोरोना संकटातही कोट्यावधीची विकास कामे मार्गी लावत आहेत. त्यांचे हे काम असेच पुढे सुरू राहणार आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांचा एक लाख मतांनी विजय होईल, असे त्या म्हणाल्या.

Post a Comment