नगर : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील शेतकरी अपहरणाचे गुन्ह्यामध्ये फरार असलेला आरोपीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.
अक्षय सुभाष सोनवणे (वय 25, रा. वाडेगव्हाण, पारनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. खडका फाट्यावरील टोलनाक्याजवळ मोठ्या शिताफीने या आरोपीस कैद करण्यात आले आहे.
मे 2021 मध्ये राजाराम चंदर राजाराम ढवळे (वय-44 वर्षे, धंदा- शेती, रा. राजापूर शिवार, ता. श्रीगोंदा) यांचे राजापूर शिवारातील घोडनदी पात्रालगत असलेल्या गट नं. 40 मधील शेत जमिनीमधून आरोपी संतोष राधू शिंदे व त्याचे साथीदारांनी अंदाजे 12 लाख किमतीची माती बळजबरीने चोरुन नेली होती.
या घटनेबाबत ढवळे यांनी बेलवंडी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. त्याचा राग मनामध्ये धरुन दोन सप्टेंबर 2021 रोजी आरोपी अक्षय सोनवणे (रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर) याने व त्याच्या साथीदारांनी फिर्यादीचे ढवळगाव येथून अपहरण करुन लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. त्याबाबत बेलवंडी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्यातील मुख्य अक्षय सोनवणे हा फरार झाला होता. नमुूद फरार आरोपीचा पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शोध घेत होते.
त्याच वेळी पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली कि, अक्षय सोनवणे हा एका पांढर्या रंगाच्या महिन्द्रा एक्सयुव्ही गाडी नंबर एमएच- 16 - बीएम- 7001 या वाहनामधून -अहमदनगर रस्त्याने अहमदनगर शहराचे दिशेने येत आहे. खडका फाटा टोलनाका येथे सापळा लावून त्यास अटक करण्यात आली.
सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे, पोलिस हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे, दत्तात्रय गव्हाणे, विजयकुमार वेठेकर, फकीर शेख, पोना सुरेश माळी, विशाल दळवी, संतोष लोढे, संदीप दरंदले, ज्ञानेेशर शिंदे, रवि सोनटक्के, पोलिस कॉन्स्टेबल जालिंदर माने, रणजित जाधव, शिवाजी ढाकणे, चालक पोलिस हेडकॉन्स्टेबल संभाजी कोतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Post a Comment