सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी केले गावाचे नाव उज्वल...


श्रीगोंदा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व कुटुंबाची साथ मिळाल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी गावाचे भावडी गावचे नाव उज्वल केले, असे प्रतिपादन आढळगाव जिल्हा परिषद गटाचे युवा नेते रमेश गिरमकर यांनी केले. 

भावडी येथील सर्वसामान्य कुटुंबातील पाच विद्यार्थी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले असल्याबद्दल आज ग्रामस्थांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य हौसराव भोस होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती पती शंकर कोठारे, सुरेश शेंडगे, काका कदम, शरद गव्हाणे, युवा नेते सचिन भोस, भावडीचे माजी सरपंच श्रीकांत भोस, अध्यक्ष शांतीलाल कोरडकर, अनिल शंकर कोरडकर, अमॄत पांडुळे, बाबासाहेब चोरमले, अनिल कोरडकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते शहाजी कोरडकर, पोलिस पाटील संपत कोरडकर, सुभाष भोस, संजय पांडुळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

गिरमकर म्हणाले की, सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी शिक्षण घेतले, तर पुढील पिढी सुक्षिशित होते. सध्याचे स्पर्धेचे युग असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या जगात टिकण्यासाठी व आपल्या कुटुंबाची प्रगती करण्यासाठी शिक्षण घेतले पाहिजे. 

आज भावडी सारख्या छोट्या गावातील विद्यार्थी कायद्याचे शिक्षण घेऊन समाजसेवेत दाखल झाले. त्यामुळे या गावाचा नावलौकिक निश्चितच वाढला आहे. अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी यश मिळवल्यानंतर त्या कुटुंबाला समाजात ही मान सन्मान मिळत असतो. त्यामुळे पुढील काळात ही या गावातील मुलांनी मोठे अधिकारी बनावेत, अशी भावना व्यक्त केली. 

यावेळी यशस्वी विद्यार्थी जीवन भोस, सुदाम पांडुळे, सचिन कोरडकर, सागर कोरडकर, अनिल गाढवे, निलेश पांडुळे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post