कर्जत : पारधी समाजाला यापुढे समाजात मुळ प्रवाहात सामील होण्यासाठी सर्वानी एकजूट राहायला पाहिजे. कोणत्याही समाजाच्या एकीमुळेच प्रगती होते. त्यामुळे आता खबरीगिरी बंद करा आणि समाज जागृत करुन व्यवसाय उभारा आणि स्वतःची आणि समाजाची प्रगती साधा. शाम भोसले सारखी व्यक्ती फार क्वचित समाजात निर्माण होत असतात. त्याला साथ द्या असे प्रतिपादन आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी केले.
कर्जत येथे रिपब्लिकन पार्टी आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ठाण्याचे विभागप्रमुख विनोद भालेराव, कर्जतचे तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम, सुभाष साळवे, भीमराव साळवे, आदी उपस्थित होते. भटक्या विमुक्त जाती- जमात आदिवासी संघटनेचे अध्यक्ष शाम भोसले यांनी शेकडो कार्यकर्त्यासह आरपीआयमध्ये रविवारी प्रवेश केला.
जिल्हाध्यक्ष सुनील साळवे म्हणाले की, शाम भोसले यांनी झोपलेल्या समाजाला जागृत केले आहे. गुन्हा दाखल केल्यावर प्रथम चौकशी झाली पाहिजे. त्यानंतर तपासात काही सिद्ध झाल्यास पोलीस प्रशासनाने अटक करावी. केवळ समाज बदनाम आहे म्हणून खोटे गुन्हे यापुढे पारधी समाजावर खपवले जाणार नाही.
भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भारताचे स्वप्न पाहिले आहे ते सत्यात उतरविण्यासाठी मंत्री रामदास आठवले काम करीत आहे. त्यांना साथ देण्यासाठी सर्वानी मतभेद विसरून एकत्र येणे आवश्यक आहे.
भोसले यांच्या पक्ष प्रवेशासाठी आजची १२ तारीख का दिली तर केवळ समाजाची ज्यांनी आजतागायत फरफट केली त्यांचे बारा वाजविण्याचे काम केले जाणार आहे. ज्यांनी समाजाला वेठीस धरून आपला स्वार्थ साधला त्यांचे बारा वाजवायचे आहेत. पारधी समाजाला यापुढे सर्व शैक्षणिक आणि शासकीय सुविधा आणि लाभ देण्याचे काम तात्काळ पार पाडायचे आहे.
प्रलंबित प्रश्नाना न्याय द्यायचे आहे. समाजाला ताकद देण्याचे काम करायचे आहे. पोलिसांची चमचेगिरी यापुढे बंद करायची आहे. केवळ एकमेकांना दोष देण्यापेक्षा एकमेकांना साथ द्या आणि समाजाचा विकास करा असे आवाहन केले.
भटक्या विमुक्त जाती- जमाती आदिवासी संघटनेचे अध्यक्ष शाम भोसले म्हणाले की, आजचा दिवस कर्जत-जामखेड आणि श्रीगोंदा तालुक्याची क्रांती झाली.
आजपर्यंत फक्त समाजाचा वापर करून अनेकांनी आपल्या स्वताचा स्वार्थ साधला. मात्र यापुढे आता हे होणार नाही. आजपासून फक्त समाज सुधारण्यासाठीच प्रयत्न केला जाणार. समाज अंधारात आहे मात्र त्यास उजेडात आणण्यासाठी जीवाचे रान करणार आहे. आता संघटन हे संघटनच राहणार आहे. जमिनी, घरकुल, शैक्षणिक जातीचे दाखले यापुढे प्राधान्याने सोडविले जाणार आहे. यासाठी आपण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्धार केला.
आज रिपब्लिकन पक्षात आपण प्रवेश करून समाजासाठी काम करण्याचा मानस शाम भोसले यांनी केला. आज समाज एकत्र आला. यापुढे समाजावरील अन्याय कदापी सहन करणार नाही असा विश्वास उपस्थित समाजाला दिला.
शाम भोसले यांच्यासह कर्जत, जामखेड व श्रीगोंदा तालुक्यातील आदीवाशी भटके विमुक्त जाती जमातीचे शेकडो कार्यकर्त्यांनी आरपीआयमध्ये प्रवेश केला. यात प्रामुख्याने अनिल भोसले, शोभराज काळे, श्रीकांत भोसले, आयमन काळे, नुरा भोसले, ज्योती भोसले, चेतन भोसले, धनंजय काळे, राजुर चव्हाण, विलास काळे, शुभम भोसले, सुभाष काळे यांनी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
याप्रसंगी अनेक महिला आणि पुरुषांनी समाजात जगताना येणारे अनुभव कथन केले. पारधी समाजाच्या महिलांना देखील सन्मान द्या. त्या देखील कुणाच्या आई, बहीण, मुली आणि पत्नी आहेत. समाजात वावरताना आम्हाला आजमितीस देखील हीन वागणूक का दिली जाते ? कसली आणि कुठली घटना घडली गुन्हा आमच्या माथी का ? मारला जातो असा प्रश्न उपस्थित करत व्यासपीठावरील लोकांना विचार करण्यास भाग पाडले.
कुठे चोरी झाली की आम्हाला आरोपीसारखे पाहिले जाते. वास्तविक पाहता येथील लोकांचा काही संबंध नसताना पोलिसांचा ससेमिरा आमच्या मागेच का ? असा सवाल उपस्थित करत प्रशासनास देखील धारेवर धरले. प्रशासनाने निपक्ष आपले कार्य पार पाडावे असा एकसुर यानिमित्ताने पारधी समाजाकडून देण्यात आला.
याप्रसंगी ॲड. पी. वी. कोपनर, शरद आढाव, सोहन कदम, सागर कांबळे, लखन भैलुमे, रोहिदास आढाव, रमेश आखाडे, धनंजय कांबळे, सचिन कांबळे, देवा खरात, विनोद थोरात, बळी कांबळे, संदीप अण्णा भैलुमे, बी. जी. भैलुमे, धर्मा चव्हाण, प्रसाद भोसले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवकचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल काकडे यांनी केले तर तालुकाध्यक्ष संजय भैलुमे यांनी आभार मानले.
यावेळी सीमा भोसले, चंपा पवार, आश्विनी पवार, रोहिणी काळे, पार्वती भोसले, शैला काळे, भाग्यश्री काळे, नेहा काळे, बंटी भोसले, मात्री काळे, बंडू काळे, यांनी समाजाच्या विविध अडचणी आणि समस्या उपस्थितासमोर व्यक्त केल्या.
रविवारी आदिवासी भटक्या विमुक्त जाती-जमाती आदिवासी संघटनेचे अध्यक्ष शाम भोसले यांनी शेकडो कार्यकर्त्या समवेत आरपीआयमध्ये प्रवेश केला. भोसले यांचा सामाजिक कार्याचा आवाका पाहत यासह ते उत्तम प्रवचनकार आणि किर्तनकार असल्याने आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी तात्काळ केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने त्यांना आरपीआयच्या आदिवासी पारधी समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती दिली.

Post a Comment