अकोले ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी कांद्याचे लिलाव झाले. सुमारे दीड हजार कांदा गाेण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला सर्वाधिक 1800 चा प्रतिक्विंटल भाव मिळाला.
येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी कांद्याचे लिलाव झाले. या लिलावात कांद्याच्या एक हजार 443 गोण्यांची आवक झाली. यामध्ये एक नंबर कांद्याला 1601 ते 1800, दाेन नंबर कांद्याला 1401 ते 1601, तीन कांद्याला 851 ते 1400, गोल्टी कांद्याला 951 ते 1301, खाद 200 ते 600 प्रमाणे बाजार भाव मिळाले आहेत.
अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार या तीन दिवशी लिलाव
होत आहेत. शेतकरी वर्गाने आपला कांदा योग्य बाजार भाव मिळण्यासाठी
लिलावाच्या आदल्या दिवशी सकाळी अकरा ते चार व लिलावाच्या दिवशी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत व कांदा 50 किलो बारदान गोणीत, वाळ्वून, निवड करुन बाजार
समितीमध्ये विक्रीसाठी बाजार समितिचे आवारात आणावा, असे बाजार समितिचे
सभापती परबतराव नाईकवाडी, उपसभापती भरत देशमाने, संचालक व सचिव अरुण
आभाळे यांनी केले आहे.

Post a Comment