अमर छत्तीसे
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्याचे तहसीलदार म्हणून वादाच्या भोवर्यात सापडल्यामुळे प्रदिप पवार यांची बदली झाली होती. त्यामुळे त्यांचा पदभार अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांच्याकडे असल्यामुळे प्रभारीराज होते. हे प्रभारीराज आता संपुष्टात आले आहे. श्रीगोंदा तहसीलदार म्हणून मिलिंद कुलथे यांची नियुक्ती केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून श्रीगोंदा तहसीलदार म्हणून कोणाची वर्णी लागणार यावर चर्चा होत होत्या. या चर्चेत आघाडीवर मिलिंद कुलथे यांचे नाव होते. पण महिना उलटूनही त्यांची नियुक्ती होत नव्हती.
अनेकांनी नवीन दुसरे तहसीलदार येणार अशा चर्चा केल्या. पण आज शासनाने कुलथे यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे श्रीगोंद्यातील तहसील कार्यालयातीलच प्रभारीराज संपुष्टात आले आहे.
पण आता नव्याने हजर होणारे कुलथे हे अनुभवी अधिकारी असल्यामुळे त्यांना आपल्या कार्यालयातून कारभार सुधारण्यासाठी प्रयत्न करावे, लागणार हे निश्चित आहे.
दरम्यान प्रभारीराज असताना पवार यांनी उत्कृष्टपणे संभाळले. त्यांच्या या उत्कृष्ट कारभारामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लागत होते.

Post a Comment