पैसे न दिल्याच्या कारणावरून एकाचा खून


राहाता ः
पैसै न दिल्याचे कारणावरुन रस्त्याने जाणार्‍या प्रवाशाची हत्या केल्याची घटना  राहाता तालुक्यातील गणेशनगर फाटा येथे घडली. या प्रकरणी  चार तृतीयपंथीयांसह त्यांच्या चार साथीदारास जेरबंद करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 12 तासांच्या आत ही धडक कारवाई केली आहे. पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

सचिन उत्तम जाधव उर्फ संचिता तमन्ना पवार (वय  26, रा. सुभाष कॉलनी, वार्ड नं. 6, श्रीरामपूर), विकास दशरथ धनवडे उर्फ रुपाली सलोनी शेख (वय 25, ), आनंद फौजी शेलार उर्फ रुचीरा सलोनी शेख (वय- 20), लक्ष्मण शंकर वायकर उर्फ लक्ष्मी सलोनी शेख (वय- 20, रा.  वर्षे, रा. इंदिरानगर, कोपरगाव), अभिजीत उर्फ गोट्या बाळू पवार (वय  23, रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर), गौरव उर्फ सनी भागवत पवार (वय- 19, रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर), राहुल उत्तम सोनकांबळे  (वय 22, रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर), अरबाज सत्तार शेख (वय 19, रा.खंडाळा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

इरफान रज्जाक शेख (रा. खंडाळा) हा आरोपी फरार असून, पोलिस त्याच्या मागावर आहेत. दिलीप आभाळे हे व त्यांचे मित्र निवृत्ती ऊर्फ नंदू चांगदेव क्षीरसागर असे दोघे गणेशनगर येथे पेट्रोल भरण्यासाठी जात असताना गणेशनगर फाटा येथे काही तृतीय पंथीयांनी आभाळे यांना आडवून पैशांची मागणी केली होती. त्यावरुन तृतीयपंथी व आभाळे यांच्यात वाद झाले होते. त्याचा राग मनात धरून तृतीयपंथीयांनी त्याचदिवशी इतर साथीदारांसह एकरुखे गावामध्ये जावून आभाळे व निवृत्ती ऊर्फ नंदू चांगदेव क्षिरसागर यांना लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली होती. त्यानंतर आभाळे यांचे औषध उपचार चालू असताना निधन झाले.


सदर घटनेबाबत महेश दिलीप आभाळे यांनी राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सचिन उत्तम जाधव उर्फ संचिता तमन्ना पवार (रा. श्रीरामपूर) व त्याचे नऊ साथीदाराविरुध्द दाखल करण्यात आलेला आहे. सदरचा गुन्हा दाखल झाल्यांनतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी गुन्हा घडले ठिकाणी एकरुखे, ता.राहाता येथे भेट देवून घटनेची व आरोपींची माहिती घेतली.

त्यानंतर पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमून आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई सोपान गोरे, सफौ मन्सूर सय्यद, पोहेकॉ भाऊसाहेब काळे, विजयकुमार बेठेकर, मनोहर गोसावी, पोना शंकर चौधरी, दिलीप शिंदे, रवी सोनटक्के, संतोष लोढे, पोकॉ विनोद मासाळकर, रोहिदास नवगिरे, मयूर गायकवाड, चालक पोहेकॉ संभाजी कोतकर अशांनी मिळून गुन्ह्यातील आरोपींचे ठावठिकाणाबाबत गोपनिय माहिती घेवून वरील आरोपींना अटक केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post