राहात्यात कांद्याच्या भावात वाढ...


राहाता : येथील बाजार समितीत शुक्रवारी  कांद्याच्या दहा हजार  गोण्यांची आवक झाली. गुरुवारच्या तुलनेत आज शुक्रवारी कांद्याच्या भावात 50 रुपयांची वाढ झाली. 

राहाता बाजार समितीत दहा हजार 193 कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला 1850 रुपये भाव प्रतिक्विंटल मिळाला. 

कांद्याचे भाव प्रति क्विंटलमध्ये एक नंबर कांदा : 1450 ते 1850, दोन नंबर कांदा : 900 ते 1400, तीन नंबर कांदा : 350 ते 850, गोल्टी कांदा : 1200 ते 1400, जोड कांदा : 100 ते 400.

शेतकर्यांनी कांद्याची प्रतवारी करूनच कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन राहाता बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे. 

आज कांद्याच्या भावात वाढ झालेली असली तरी ती वाढ एक ते तीन प्रतवारी कांद्याच्या भावात झालेली आहे. गोल्टी कांदा व जोड कांद्याचे भाव स्थिर होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post