नगर ः जिल्ह्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यांच्या जागेवर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे.
श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकपदी स्वाती रामराव भोर यांची नियुक्ती झाली आहे. पिंपरी चिंचवडचे सहाय्यक आयुक्त संजय भाऊसाहेब नाईक यांची नगर मुख्यालय (गृह) पोलिस उपअधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. नगर शहर विभागाचे उपअधीक्षक विशाल ढुमे यांची औरंगाबाद शहर सहाय्यक आयुक्तपदी बदली झाली आहे.
श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक दीपाली काळे यांची नाशिक पोलिस अकादमीमध्ये पोलिस अधीक्षकपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर आंबेजोगाई (जि. बीड) अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती रामराव भोर यांची बदली झाली आहे. पोलिस मुख्यालय (गृह) पोलिस उपअधीक्षक प्रांजली नवनाथ सोनवणे यांची सोलापूर शहर येथे सहाय्यक आयुक्तपदी निवड झाली आहे.
त्यांच्या जागेवर पिंपरी चिंचवडचे सहाय्यक आयुक्त संजय भाऊसाहेब नाईक यांची बदली झाली आहे. नगर शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे यांची औरंगाबाद शहर सहाय्यक आयुक्तपदी निवड झाली आहे.
नगर जिल्ह्याचे रहिवाशी असलेले व सध्या गडचिरोली येथे विशेष कृती दलाचे पोलिस उपअधीक्षक भाऊसाहेब कैलास ढोले यांची हवेली (जि. पुणे) पोलिस उपअधीक्षकपदी बदली झाली आहे. पंकज नवनाथ शिरसाठ यांची ठाणे शहर सहाय्यक आयुक्तपदावरून मिरा-भाईंदर-वसई-विरारच्या सहाय्यक आयुक्तपदी निवड झाली आहे.

Post a Comment