नगर ः येथील दादापाटील शेळके पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारमध्ये आज (शनिवारी) कांद्याचे लिलाव झाले. यामध्ये एक नंबर कांद्याला सुमारे 1800 रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. नेहमीच्या तुलनेत आज बाजार समितीत मात्र कांद्याची आवक वाढले होती.
हेही वाचा ः श्रीगोेंद्यात इच्छुकांची भाऊगर्दी... भावी जिल्हा परिषद सदस्यांकडून कार्यक्रमांना हजेरी...
नेप्ती उपबाजार समितीत कांद्याच्या 57 हजार 200 गोण्यांची आवक झाली. कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याचा परिणाम काही अंशी भाववर होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे बाजार भाव कमी झालेले असून त्यात वाढ होत नसल्याने कांदा उत्पादक चिंतातूर झालेले आहे.
बाहेरील राज्यातून कांदा खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे. त्याचा परिणाम कांद्याच्या भावावर होत आहे. बाहेरील राज्यातून मागणी वाढल्यानंतर कांद्याच्या भावात वाढ होईल, असे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे. कांद्याचे प्रतवारीनुसार भाव ः एक नंबर कांदा ः 1450 ते 1800, दोन नंबर ः 900 ते 1450, तीन नंबर ः 250 ते 550.
शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करून व निवडून विक्रीस आणावा,. असे आवाहन बाजार समितीचे सभापती, उपसभापती व संचालकांतर्फे करण्यात येत आहे.

Post a Comment