राहात्यात डाळिंबाला चांगला भाव


राहाता ः
राहाता बाजार समितीत डाळिंबाने आज चांगलाच भाव खालला आहे. मंगळवारच्या तुलनेत आज बुधवारी डाळिंबाच्या किलोच्या भावात दहा रुपयांनी वाढ झाली.

येथील बाजार समितीत सात हजार 549 क्रेटस डाळिंबाची आवक झाली. एक नंबर कांद्याला  दहा हजार 153 क्रेडस आवक झाली. 215 किलो दराने राहात्यात डाळिंबाला भाव मिळाला. 
 
प्रतवारीनुसार भाव ः एक नंबर डाळिंब ः 126 ते 215, दोन नंबर ः 81 ते 125, तीन नंबर ः 41 ते 80, चार नंबर ः अडीच ते 40 रुपये किलो दराने विक्री झाला. 

डाळिंबासह कांद्याची प्रतवारी करून शेतकऱ्यांनी माल विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post