राहाता ः राहाता बाजार समितीत डाळिंबाची बारा हजार क्रेडस आवक झाली. डाळिंबाला आज मंगळवारी विक्रमी भाव मिळाला.
राहाता बाजार समितीत मंगळवारी डाळिंबाचे लिलाव झाले. एकूण 12 हजार 297 क्रेडस डाळिंबाची आवक झाली हाेती.
यामध्ये एक नंबर डाळिंबाला 121 ते 205, दाेन नंबरला ः 81 ते 120, तीन नंबर डाळिंबाला ः 41 ते 80, चार नंबर डाळिंबाला ः अडीच रुपये ते 40 रुपये किलाेचा भाव मिळाला.
एक नंबर डाळिंबाला 205 रुपये किलोचा भाव मिळाल्याने डाळिंब उत्पादनांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

Post a Comment