निळवंडे धरणातून 4753 क्यूसेक विसर्ग सुरू


नगर : भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे. निळवंडे धरणातून 4 हजार 753 क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात  आला आहे. पावसाची तीव्रता वाढल्यास विसर्गात वाढ केली जाण्याची शक्यता व्यक्त होत.आहे.

भंडारदरा व निळवंडे दोन्हीही धरणे भरलेली आहेत. त्यामुळे नव्याने धरणात जमा होणारे सर्व पाणी सोडून देण्यात येते. त्याचा फायदा होऊ लागला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे भंडारदरा धरणातून स्पीलवे मधून 1218 क्यूसेक तर वीज केंद्रातून 816 असा एकूण 2034 क्यूसेक विसर्ग सुरू करन्यात आला आहे.

निळवंडे धरणातून स्पीलवे मधून 4103 क्यूसेक तर वीज निर्मिती केंद्रातून 650 क्यूसेक असा एकूण 4753 क्यूसेक विसर्ग प्रवरा पात्रात सायंकाळी सुरू होता. पावसाचा जोर वाढल्यास रात्रीतून त्यात वाढ होऊ शकेल.

गेल्यावर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी चांगला  पाऊस झाल्याने शेतकर्‍यांमध्ये समानाधानाचे वातावरण आहे. तर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आज भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढला आहे. 

यंदा चांगल्या पावसाने हजेरी लावली आहे. निळवंडे धरणातून 4 हजार 753 क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात  आला आहे. पावसाची तीव्रता वाढल्यास विसर्गात वाढ केली जाईल असे सांगण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post