नगर : शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या नवनियुक्त विश्वस्त मंडळाला उच्च न्यायालयाने अवघ्या पाच दिवसांतच स्थगिती दिली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहेे.
विश्वस्त मंडळाशी संबंधित प्रकरण न्यायालयात सुरू असताना न्यायालयाला अवगत न करता नव्या मंडळाने सूत्रे कशी स्वीकारली? अशी विचारणा न्यायालयाने केली आहे.
यावर २३ सप्टेंबरला म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. राज्यातील सरकारने विश्वस्त मंडळ जाहीर करताना आमदार आशुतोष काळे यांची अध्यक्षपदी निवड केली.
मात्र आता न्यायालयीन निर्णयावर या विश्वस्तांचे भवितव्य अवलंबून आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार 23 सप्टेंबरपर्यंत कोणताही निर्णय घेता येणार नाही.
विशेष म्हणजे न्यायालयाच्या परवानगीनंतरच सरकारने नियुक्त केलेल्या विश्वस्त मंडळाला धोरणात्मक निर्णय घेता येणार आहे. गेल्या दोन वर्षापासून साई संस्थानचा कारभार तदर्थ समितीकडे होता.

Post a Comment