नगर ः कोरोनाच्या संकटकाळात डॉक्टरांची खरी गरज समाजाला कळली. कोरोनामध्ये अनेक डॉक्टरांनी देवदूताप्रमाणे रुग्णांची सेवा केली. नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी डॉक्टरांचे योग्य मार्गदर्शन व उपचार गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
सावेडी येथे ऑर्किड पॉली क्लिनिकचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नुकताच झाला. यावेळी विकास चव्हाण, युवराज लालबेगी, बाबासाहेब रोहोकले, गणेश खाटीक, शरद कचरे, जालिंदर सुपेकर, अमोल सदाफुले, पांडुरंग खरात, राहुल भंडारी, अविनाश पवार, चीन रणवरे आदींसह डॉक्टर्स व एम. आर. युनियनचे अध्यक्ष उपस्थित होते.
प्रास्ताविकात संचालक डॉ. अतुल गणपत म्हस्के यांनी वैद्यकिय क्षेत्रात मागील दहा वर्षाचा अनुभव घेऊन नागरिकांच्या सोयीसाठी व वैद्यकिय सेवा देण्याकरिता ऑर्किड पॉली क्लिनिकचे शुभारंभ करण्यात आले आहे. या क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णांना योग्य मार्गदर्शन व उपचार मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाहुण्यांचे स्वागत क्लिनिकच्या संचालिका डॉ. अदिती अतुल म्हस्के यांनी करुन, या क्लिनिकच्या माध्यमातून मधुमेह, ह्रदयरोग, उच्च रक्तदाब, लहान मुलांचे आजार, हाडांचे आजार, महिलांचे आजार सौंदर्य समस्यांवर उपचार केले जाणार आहेत. तसेच लहान बालके व गरोदर स्त्रीयांचे लसीकरणाची देखील सोय करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. उपस्थितांचे आभार प्रसाद खरात यांनी मानले.


Post a Comment