पाथर्डी ः श्री वृध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्प उभारणीची पायाभूत कामे, मशिनरी खरेदी, बांधकामे यांच्या निविदा प्रक्रिया सुरू असून,काही कामे सुरूही झाली. सरकारने ठरवून दिलेल्या मुदतीत नियोजन करून इथेनॉल प्रकल्पाची वेळेत उभारणी करू, अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार अप्पासाहेब राजळे यांनी दिली.
तालुक्याची कामधेनू असलेल्या श्री वृध्येश्वर सहकारी साखर कारखान्याची सुवर्णमहोत्सवी ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी चार0 सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ऑनलाईन झाली. या वेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष रामकिसन काकडे,आमदार मोनिकाताई राजळे, जि.प.सदस्य राहुल राजळे, संचालक उद्धव वाघ, सुभाष बुधवंत, अनिल फलके, डॉ. यशवंत गवळी, साहेबराव सातपुते,शरद अकोलकर,कुशीनाथ बर्डे, नारायण काकडे, उषा खेडकर, बाबासाहेब किलबिले व्यासपीठावर होते.
कारखान्याचे कार्यालयीन कामकाज संगणकीय पद्धतीने सुरू केले आहे.कारखाना अंतर्गत मशिनरीमध्ये आवश्यक ठिकाणी स्वयंचलित यंत्रणा बसविल्या आहेत,असे स्पस्ट करून राजळे पुढे म्हणाले,सहकार खात्याच्या आदेशान्वये शेअर्स रक्कम वाढीव स्वरुपात पंधरा हजार रुपये करण्यात आली आहे.या पोटनियम दुरुस्तीमुळे कारखान्यास स्वनिधी उभारणीस मदत होणार आहे.
इथेनॉल प्रकल्पाच्या सुधारित अहवालानुसार कारखान्याने पंधरा टक्के रक्कम स्वभांडवल रुपाने उभी करावयाची आहे.त्यानुसार मुदत ठेवींच्या रुपाने पावणेदोन कोटींच्या ठेवी कारखान्याकडे जमा झाल्या आहेत.शासनाने दिलेल्या मुदतीतच प्रकल्पाची उभारणी केली जाईल, असा विश्वासही राजळे यांनी दिला.
कार्यकारी संचालक जे.आर.पवार, सरव्यवस्थापक भास्कर गोरे, विविध खातेप्रमुख याप्रसंगी उपस्थित होते. अहवालवाचन विनायक म्हस्के यांनी केले.ताळेबंद वाचन लेखापाल संभाजी राजळे यांनी केले. संचालक सुभाष ताठे यांनी आभार मानले.

Post a Comment