राहाता ः राहाता बाजार समितीत कांद्याच्या दहा हजार कांदा गोण्यांची आवक झाली. शुक्रवारी झालेल्या लिलावाच्या तुलनेत आज कांद्याच्या भावात 150 रुपयांनी घसरण झालेली आहे.
राहाता बाजार समितीत कांद्याच्या दहा हजार 220 कांदा गोण्यांची आवक झाली. यामध्ये एक नंबर कांद्याला सर्वाधिक 1700 रुपयांचा प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. शुक्रवारच्या तुलनेत कांद्याच्या भावात मात्र आज घसरण झालेली आहे. कांद्याला मागणी कमी झाल्यामुळे भावावर त्याचा परिणाम होत आहे.
कांद्याचे प्रतवारीनुसार भाव - एक नंबर कांदा ः 1300 ते 1700, दोन नंबर कांदा ः 850 ते 1250, तीन नंबर कांदा ः 400 ते 800, गोल्टी कांदा ः 1100 ते 1300, जोड कांदा ः 100 ते 400.
शेतकर्यांनी कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करून तो विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आलेले आहे.
सध्या बाहेरील राज्यातून कांद्याला मागणी कमी झालेली आहे. त्याचा परिणाम कांद्याच्या भावावर होत आहे. मागणी वाढल्यानंतर कांद्याच्या भावात वाढ होईल, अशी अपेक्षा सर्वांना लागली आहे.

Post a Comment