बाधिताचा आकडा कमी झाला तरी चिंता कायम...


नगर ः
जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा कधी कमी जर कधी जास्त होत आहे. मंगळवारी कोरोना बाधितांचाआकडा 953 झाला होता. त्यात आज 195ने घट झालेली आहे. मात्र जिल्ह्यात चिंताकायम आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात यावा, यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहे. या प्रयत्नांवर काही बेफिकिरांकडून पाणी फेरण्याचे काम सुरु आहे. प्रशासनाने जारी केलेल्या आदेशात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात नसल्याने अनेकदा समोर आलेले आहे. 

अशांवर प्रशासनाकडून कारवाई होत असली तरी काहींची बेफिकीरी सुरु आहे. आता प्रशासनाने बेफिकिरांवर आता कडक कारवाई करणे गरजेचे आहे. कडक कारवाई मोहिम राबविली तरच कोरोना आटोक्यात येण्यास मदत होणार आहे.
जिल्हा रुग्णलयाच्या तपासणी अहवालात 105, खासगी तपासणीत 412 तर रॅपिड चाचणीत 240 जण बाधित आढळून आलेले आहेत. यामध्ये संगमनेर तालुक्यात  सर्वाधिक 97 रुग्ण बाधित आढळून आलेले आहेत. 
 
दुसर्यास्थानी आज पारनेर तालुक्याने झेप घेतलेली आहे. पारनेर तालुक्यात 73 बाधित आढळून आलेले आहे. तिसर्यास्थानी राहाता तालुका असून अकोल्यात 65 जण बाधित आढळून आलेले आहेत.  नगर शहरात बाधितांचा आकडा तसा आटोक्यात आलेला आहे. दिवसभरात नगर शहरात 17 बाधित आढळून आलेले आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post