नगर ः जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीत झालेला गैरव्यवहार प्रकरणाच्या तक्रारी झालेल्या आहेत. या तक्रारींची चौकशी आता जिल्हा पातळीवरून सुरु झालेली असून आपल्यावर कारवाई होण्याची भीती असल्यामुळे संबंधिताकडून आता लोकप्रतिनिधींची बदनामी करण्याचे षडयंत्र सुरु करण्यात आल्याची चर्चा एका तालुक्यात जोरधरत आहे.
जिल्ह्यातील एका तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या कारभारावर एका पदाधिकाऱ्याने जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या तक्रारी सुरु आहेत. आता जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने या तक्रारींची चौकशी केलेली आहे.
या चौकशीच्या अहवालानुसार सध्या जिल्हा परिषद प्रशसानाने संबंधितावर कारवाई करण्याच्या हालचाली सुरु केलेल्या आहेत. आपल्या बाबत तक्रारी करण्यात आल्यामुळे संबंधिताने आता एका पदाधिकार्यावर आरोप करून प्रशासनाची दिशाभूल करण्याचे काम हाती घेण्यात आलेले असल्याचा आरोप आता संबंधित पदाधिकाऱ्याकडून केला जात आहे.
या आरोप-प्रत्यारोपांमुळे आता त्या तालुक्यातील वातावरण चांगलेच तापलेेले आहे. त्यामुळे त्या प्रकरणाची चौकशी करून प्रशासनाने तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा आता सर्वसामान्यांमधून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणातील माहिती प्रशासनाच्या अखत्यारित असतानाही ती बाहेर गेली आहे. त्यावर आता सर्वसामान्यांमध्ये चर्चा सुरु झालेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासाने या प्रकरणाची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment