पारनेर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रूग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्यानंतर प्रशासनही हातबल झालेले असताना आमदार नीलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे लोकसभागातून सुरू केलेले एक हजार 100 बेडचे शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर देशातच नव्हे तर जगात कौतुकाचा विषय ठरले. रूग्णसंख्या घटू लागल्यानंतर राज्यासह देशभरातील कोव्हिड सेंटर कधीच बंद झालेले असताना आमदार लंके यांच्या मार्गदर्शनाखालील भाळवणीचे हे आरोग्य मंदिर अजूनही सुरूच आहे. सध्या तेथे ८३ रूग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत २३ हजार ७३८ रूग्णांनी तेथे उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे.
रूग्णांमधील कोरोनाची भीती दूर करण्यासाठी
आमदार नीलेश लंके यांनी रूग्णांना आधार दिल्याने या कोव्हिड सेंटरमध्ये एकाही
रूग्णाचा मृत्यू झाला नाही, हे देखील विशेष ! किंबहूना रुग्णाच्या मनातील
करोनाची भीती दूर करण्यासाठी आमदार लंके यांनी तेथेच मुक्काम ठोकून केलेले
समुपदेशन हेच या आरोग्य मंदिराच्या यशाचे गमक म्हणावे लागेल !
कोरोना रूग्णसंख्या वाढू लागल्यानंतर आमदार लंके यांनी पहिल्या लाटेमध्ये कर्जुल हर्या येथे एक हजार बेडचे शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर सुरू करून तेथे ४ हजार ७६८ रूग्णांवर उपचार करण्यात आले. त्यानंतर काही काळ गेल्यानंतर दुसऱ्या लाटेने घातलेल्या थैमानामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. इतक्या मोठया संख्येने रूग्णांची सोय कशी करणार असा प्रशासनापुढेही प्रश्न होती.
जिल्हयापुरता विचार केला तर विविध साखर
कारखानदारांकडे पायाभूत सुविधा असतानाही सुरूवातीच्या काळात कोरोनाच्या भीतीने कोव्हिड सेंटर सुरू करण्यास कोणीही पुढे आले नाही. आमदार नीलेश लंके
यांच्यापुढे प्रशासनाने लोकसहभागातून कोव्हिड सेंटर सुरू करण्याचा
प्रस्ताव ठेवला असता त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या पाठबळावर त्यास तात्काळ
होकार दिला.
दररोज एक हजार रूग्णांना उपचारासह जेवण, नास्ता तसेच इतर
सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येणाऱ्या खर्चाचे मोठे आव्हान होते. तरीही न
डगमगता आ. लंके यांनी भाळवणी येथे आरोग्य मंदीर सुरू करण्याचा शब्द दिला.
दोनच दिवसांत १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी या
सेंटरचा शुभारंभही करण्यात आला. दररोजच्या लाखो रूपयांच्या खर्चाची
तोंडमिळवणी करण्यासाठी आ. लंके यांच्या सहकायांनी उत्स्फूर्तपणे यथाशक्ती
देणग्या जमा केल्या. हे काम मोठया जोमाने सुरू झाले.
आमदार लंके समर्थक १५०
कार्यकर्त्यांनी तेथे स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी पुढाकार घेतला.
भाळवणी येथील भुजबळ कुटूंबियांनी त्यांचे प्रशस्त मंगल कार्यालय कोव्हीड
सेंटरसाठी मोफत उपलब्ध करून दिले. शिवाय या कुटूंबातील सदस्य आजही तेथील
रूग्णांची सेवा करीत आहेत.
कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजविलेला असताना सामान्य घरातून आलेल्या, जवळ कोणतेही साधन संपत्ती नसताना एक आमदार केवळ कार्यकर्त्यांच्या पाठबळावर तब्बल एक हजार १०० रूग्णांसाठी सर्वसोयींनी कोव्हिड सेंटर सुरू करतो याची चर्चा जिल्हयासह राज्यभर सुरू झाली. माध्यमे, सोशल मिडियाच्या माध्यमातून लंके यांचे हे काम देशाबरोबरच जगभर पोहचले. त्यानंतर मात्र या सेेंटरसाठी देशासह जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. स्थानिक नागरीकांना धान्य, फळे, किराणा वस्तूंची मदत केली. मदतीचा हा ओघ सुरूच आहे.
अशी आहे रुग्ण संख्याशरदचंद्र पवार आरोग्य मंदिर कर्जुलेहर्या : ४ हजार ७६८शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर भाळवणी : २३ हजार ७३८ऑक्सिजन उपचार घेतलेले रुग्ण : ४ हजार २७५
Post a Comment