प्रशासन लोकाभिमुख करणार ः कुलथे

 


अमर छत्तीसे

श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुका हा अतिशय जागॄक तालुका आहे.  काम करताना आपण प्रशासन लोकाभिमुख करणार आहोत, असे तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी "तेजवार्ता"शी बोलताना सांगितले.
 
कुलथे म्हणाले की, श्रीगोंदा तालुका हा राजकीय,  सामाजिक दॄष्टीने अतिशय जागरुक असणारा तालुका आहे. या तालुक्यात काम करताना सर्वसामान्य नागरिक हा केंद्रबिंदू मानून काम करणार आहे. त्याचबरोबर प्रशासन हे लोकाभिमुख असले पाहिजे म्हणून या तालुक्यात काम करताना प्रशासन लोकाभिमुख करण्यावर आपला भर असणार आहे, असे कुलथे म्हणाले.
 
सर्वसामान्य नागरिकांचे शिधापत्रिका, विविध दाखले, फेरफार हेच कामे असतात.  ही कामे तात्काळ झाली होण्यासाठी आपला नेहमीच भरत असतो. नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी आपल्या कामाची पध्दत आहे. तीच पध्दत येथेही राबविणार आहे, असे कुलथे म्हणाले.
 
त्याचबरोबर शासनाच्या ई पीक पाहणी संकल्पनेत तालुका जिल्हयात कसा प्रथम येईल यासाठी शेतकरी वर्गाला गावपातळीवर मार्गदर्शन करणार आहे. जर कोणाचे काम रखडलेले असेल तर थेट आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार कुलथे यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post