पारनेर ः ज्योती देवरे यांच्या बदलीचे आमदार नीलेश लंके यांच्या समर्थकांनी स्वागत केले. अनेकांनी आपल्या भावनांना समाज माध्यमावर वाट मोकळी करून दिली. पारनेरसह जिल्ह्यातील अनेक समाज माध्यमांच्या ग्रुपवर सोमवारी (दि. 13) पासून सुरु झालेल्या प्रतिक्रिया आजही सुरुच होत्या. जणून प्रतिक्रियांचा पाऊसच पडला आहे.
आडिओ क्लिप प्रकरणामुळे पारनेरातील वाद थेट राज्यात पोहचला होता. या प्रकरणी आमदार नीलेश लंके यांच्या समर्थकांनीही देवरे यांच्या तक्रारी केल्या होत्या. तसेच देवरे यांनीही तक्रारी वरिष्ठांकडे केल्या होत्या. परंतु देवरे यांनी केलेल्या तक्रारीत तथ्थ आढळून न आल्याचा अहवालात प्रशासनाने म्हटले आहे.
या वादात भाजपाने उडी घेऊन देवरे यांची पाठराखण केली होती. परंतु प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी केलेली आहे. देवरे यांची तातडीने जळगाव जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीदार म्हणून त्यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे. हा अध्यादेश समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर आमदार नीलेश लंके समर्थकांनी त्याचे जोरदार स्वागत केले. तसेच देवरे यांच्या विरोधात टीका टिपन्नीही केली.
देवरे यांची बदली झाल्यानंतर तहसील कार्यालयातील काही कर्मचार्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र प्रशासनाकडून कारवाई होण्याची भीती असल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आपला आनंद एकमेकांशी दूरध्वनीवरून साधत साजरा केला.

Post a Comment