पाथर्डी ः जुन्या पंचायत समितीचे कार्यालय नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले. मात्र जुन्या इमारतीत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अजूनही त्याच ठिकाणी असल्याने तो नवीन पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात बसवण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे, शिवसेनेचे आसाराम ससे,बाजार समितीचे संचालक वैभव दहिफळे,प्रहार अपंग क्रांती संघटनेचे हुमायून आतार, दिगंबर गाडे, भाऊ तुपे आदीनी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर बैठा सत्याग्रह करत आंदोलन केले. गटविकास अधिकारी शीतल खिंडे यांच्या लेखी अश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
पंचायत समितीच्या
जुन्या कार्यालयच्या आवारात छत्रपती शिवाजी महराज यांचा पुतळा आहे. तेथील
पंचायत समीतीचे कामकाज पाच वर्षापूर्वी नवीन इमारतीत स्थालांतर झाले. त्याच
वेळी जुन्या कार्यालयाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या
पुतळ्याचे नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात स्थांलांतर करणे गरजेचे
होते. मात्र पुतळा अद्यापही जुन्याच कार्यालयात आहे.
जुने कार्यालय ओस पडले
असून सध्या त्या परिसरात प्रचंड अस्वच्छता निर्माण झाली आहे. नव्या इमारतीत
पुतळा बसविण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळून नऊ महिने झाले मात्र अद्याप
पुतळा बसवण्यात आलेला नाही. शिवप्रेमींच्या तीव्र भावना ओळखून लवकरात लवकर
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरीत करावा अन्यथा मोठे आंदोलन करू
असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
गटविकास अधिकारी शीतल खिंडे
यांच्याबरोबर झालेल्या चर्चेवेळी रवींद्र वायकर, वंचित बहुजन आघाडीचे
अरविंद सोनटक्के, शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष परमेश्वर टकले, देवा पवार, मराठा
सेवा संघाचे डॉ. योगेश वाकचौरे, एकनाथ ढोले, संतोष ढोले, विकास खोर्दे, सुनील
मरकड, प्रशांत शेळके आदी उपस्थित होते.
नोव्हेंबर महिन्याच्या
पहिल्या आठवड्यात काम सुरु केले जाईल. जुन्या पंचायत समितीमधील छत्रपती
शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी
कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. असे लेखी आश्वासन गटविकास अधिकारी खिंडे
यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
Post a Comment