जन्मभूमी युवा प्रतिष्ठातर्फे विक्रमी ५३३ झाडांचे वृक्षारोपण... ५६ व्यक्तींच्या आठवणी तेवत ठेवणार स्मृतिवृक्ष


पारनेर ः
  तालुक्यातील पाणीदार गाव म्हणून ओळखले जाणारे व समृद्ध गाव पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या नांदूर नांदूर पठार येथे कोरोना काळात मागील दीड वर्षात गावातील निधन झालेल्या ५६ व्यक्तींच्या  परिवारातील सदस्य, नातेवाईक यांनी रविवार १२ सप्टेंबरला महावृक्षारोपण अभियान २०२१ अंतर्गत दिवंगत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत  त्यांच्या स्मरणार्थ नांदूरकी, पारिजात, बकुळी, सोनचाफा, गुलमोहर, नीलमोहर ही फुलझाडे लावत नवीन चळवळ सुरू केली. तसेच पिंपळदरा येथे १४ पिंपळ लावत दरा नावाला नवसंजीवनी दिली.
 
कळस कुरण येथे नैसर्गिकरित्या जोपासना करत ५० नांदुरकी,वड, पिपरी, भेंडी यांचे केले फांदीरोपन, महिला व शेतकरी यांस भव्य वृक्षसंगोपन संवर्धन स्पर्धा २०२१ चे अयोजन करण्यात आले आहे.  ग्रामस्थ, मुंबई, पुणेकर मंडळी यांस फोटोग्राफी स्पर्धा ः "पक्षी प्राणी वृक्ष व गावशिवार अमुचा एका क्लिकवर" उपलब्ध होणार आहे.
 
या अभियानात सरपंच दिनेश घोलप, उपसरपंच सुरेश आग्रे, ग्रामपंचायत सदस्य,जलमित्र वलवे, जिजाराम चौधरी, भास्कर चौधरी, नामदेव आग्रे, शिवदास घोलप, योगेश जाधव, श्रीधर बोन्टे, वृक्षमित्र तुळशीराम ठुबे, नवनाथ घोलप, भानुदास आग्रे, रवींद्र आग्रे, योगेश राजदेव, लहू चौधरी, अण्णा अहिले यांनी वृक्षारोपण केले.
 
अमीर खान यांच्या पाणी फाऊंडेशन आयोजित जलसंधारण चळवळमधील सत्यमेव जयते वॉटर कप विजेते असणारे नांदूर पठार हे गाव. या गावातील जन्मभूमी युवा प्रतिष्ठाणचा महावृक्षारोपण अभियान  २०२१ मधील दुसरा टप्पा हा शनिवार व रविवार राबविण्यात आला.
 
आपला गाव हिरवाईने नटलेला पाहूयात व आपल्या गावाशी, मातीशी नाळ जोडण्याची अनोखी संधी निर्माण करून  वृक्षसंवर्धनसंगोपन करिता लोकसहभागातून हिरवेगार गाव अशी ओळख निर्माण करणे या उद्देशाने गावात विक्रमी ५३३ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
 
२४ जून २०२१ रोजी वटपौर्णिमा सणाच्या शुभमुहूर्तावर पारंपरिक पद्धतीने वडाची पूजा करत वडाच्या झाडाची फांदी लावत महिलांनी अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा वयोवृद्ध, तरुणी व सुवासिनी,माताभगिनीनी यांनी वडफांदी रोपण केले. त्या महिलांना प्रोत्साहन देत आंबा, चिकू व एक फुलझाड बकुळी, सोनचाफा व पारिजात भेट म्हणून देण्यात आली. तसेच गावातील गरजू शेतकरीबांधव यांस देखील आंबा,चिकू व एक फुलझाड देण्यात आली.
 
या वेळी यशवंत महाराज मंदिर परिसर, आग्रे माळ परिसर, चिंचविहिर, पानसर दरा, चौधरी माळ व वलवे मळा तसेच पिरचीच येथे आपल्या हिरा या बैलाच्या स्मरणार्थ वटवृक्षरोपण करणारे शेतकरी तुळशीराम ठुबे, सदाशिव ठुबे यांस वृक्षभेट देण्यात आले.
 
झाडांच्या नावाने असणारे दरे हे फक्त नाममात्र राहिल्याने त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी पिंपळदरा येथे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत १४ पिंपळ लावण्यात आले असून त्यांचे संगोपन संवर्धन करण्यासाठी हेतूने पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला.
 
कळस कुरण फांद्यांची लागवड गावाच्या नैऋत्य दिशेस असणारे कळस कुरण येथे नांदूरकी, वड, पीपर, भेंडी यांच्या फांद्या लावत नैसर्गिकरित्या वाढविण्याच्या उद्देशाने  ५० झाडे लावण्यात आली आहे. यावेळी माजी सरपंच अर्जुन देशमाने, ग्रामस्थ मंडळी उपस्थिती होती.
 
महावृक्षारोपण अभियानात वृक्षारोपण संगोपनसंवर्धन समितीप्रमुख अजय राजदेव (यशवंत महाराज मंदिर परिसर), शशी आग्रे (आग्रे माळ), सोपान राजदेव (कोठार वस्ती) ,धनंजय महाराज वलवे (पानसर दरा), बाळू घोलप (चिंच विहीर), रामचंद्र देशमाने (गावठाण), विक्रम आग्रे, प्रशांत पानसरे, रमेश आग्रे, ग्रामपंचायत व गणेशोत्सव मंडळांचे विशेष सहकार्य जन्मभूमी युवा प्रतिष्ठाण लाभले. रवींद्र पानसरे (कार्याध्यक्ष), संजय घोलप, पोपट राजदेव, दत्तात्रय गाढवे यांनी आभार मानले.
 
जन्मभूमी युवा प्रतिष्ठाणचे सन्माननीय अध्यक्ष श्री. शरद घोलप यांनी ग्रामस्थ,महिला, शेतकरी, मुंबईपुणेकर मंडळी यांस दोन नव्या स्पर्धा  म्हणजे फोटोग्राफी स्पर्धा २०२१ पक्षी, प्राणी,वृक्ष व गावशिवार अमुचा - एका क्लिकवर व वृक्ष संगोपन संवर्धन स्पर्धा २०२१  वड व फुलझाड जाहीर करण्यात आल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post