पाथर्डी ः शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या तुळजापुरच्या तुळजाभवानी मातेच्या पालखीचे पाथर्डी शहरात मंगळवारी जोरदार स्वागत करण्यात आले.तुळजाभवानीची ही पालखी पहील्यांदाच पाथर्डीत आली होती. कुंकवाच्या भंडाऱ्याची उधळण करीत संबळ व तुतारी वाजवीत येथील सुवर्णयुग गणपती मंडळापासून भवानीमातेच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. आमदार मोनिका राजळे, राम महाराज झिंजुर्के, शंकर महाराज मठाचे माधवबाबा, नगराध्यक्ष मृ्त्युंजय गर्जे, अशोक साठे, सिंधुबाई साठे यांनी पालखीचे
पुजन केले.अनिल साठे व अर्चना साठे यांनी बुऱ्हानगर
येथील देवीभक्तांशी संपर्क करुन तुळजाभवानीची पालखी पाथर्डी शहरात
आणण्यासाठी नियोजन केले होते. मंगळवारी देवीची पालखी शहरातील सुवर्णयुग
मंडळाच्या गणपती मंदिराजवळ आली. तेथे पालखीची विधीवत पूजा करण्यात आली.
शहरातील महिलांनी दारात
रांगोळी काढल्या होत्या. स्वागताच्या कमानी लावण्यात आल्या होत्या. शहरातील
नवीपेठ, गणेशपेठ, भवानीमाता चौक, कसबापेठ अशी अशोकराव साठे यांच्या घरापर्यंत
पालखीची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पालखी नगरकडे रवाना झाली. यावेळी
नंदकुमार शेळके, मोहन महाराज सुडके, मंगल कोकाटे, बजरंग घोडके, महेश बोरुडे, अविनाश मंत्री, सुपेकर, परिमल बाबर यांच्यासह
शहरातील भक्तगण उपस्थित होते.
Post a Comment