पाथर्डी ः शहारातील साथरोगांना प्रतिबंध करण्याबाबत नगर परिषदेतर्फे तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी युवासेना शहरप्रमुख सचिन नागापुरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांचेकडे केली आहे.
याबाबत शहर युवा
सेनेतर्फे नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले
आहे की, शहरात सध्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणी साचल्याने विविध साथीचे रोग
डेंग्यु,मलेरिया,टायफाइड,चिकनगु
त्यामुळे नागरिकांच्या
आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो आपण याबाबत गंभीरपणे विचार करून तातडीने
संपुर्ण शहरात सर्वत्र तसेच पाणी साचलेल्या खड्डयावर गटारीवर बीसी पावडर
टाकून डास प्रतिबंधक औषधाची फवारणी करण्याबाबत आरोग्य विभागास आदेश
द्यावेत.
मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी युवा सेनेच्या मागणीची दखल घेत फवारणी करण्याचे आश्वासन देऊन फवारणी करण्याबाबत कर्मचाऱ्यांना सुचना दिल्याचे नागापुरे यांनी सांगितले. यावेळी पवन डाळींबकर, दत्ता दराडे, गुड्डू चातुर, विकास दिनकर, भागवत खेडकर, आकाश घुगे आदी युवाशिवसैनिक उपस्थितीत होते.
Post a Comment