राहाता ः येथील बाजार समितीच्या आवारात डाळिंबाच्या 14 हजार 803 क्रेड्स आवक झालेली आहे. एक नंबर डाळिंबाला 155 रुपये किलोचा भाव मिळाला.
राहाता बाजार समितीत आज (रविवारी) डाळिंबाची 14 हजार 803 क्रेटसची आवक झाली. यामध्ये एक नंबर डाळिंबाला ः 121 ते 155, दोन नंबर डाळिंबाला ः 81 ते 120, तीन नंबर डाळिंबाला ः 41 ते 80, तीन नंबर डाळिंबाला अडीच रुपये ते 40 रुपये किलोचा भाव मिळाला.
डाळिंबाला चांगला भाव मिळत असल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी आनंदीत असून डाळिंबाला आणखी भाव वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment