विसापूरसह इतर तलाव भरा...जलसंपदा मंत्र्यांना आमदार पाचपुते यांचे साकडे


छत्तीसे अमर

श्रीगोंदा ः कुकडी आवर्तन चालू ठेवून विसापूरसह इतर तलाव भरून देण्यात यावे, अशी मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे आमदार बबनराव पाचपुते यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत माहिती देताना आमदार बबनराव पाचपुते म्हणाले की,  श्रीगोंदा अहमदनगर विधानसभा मतदार संघामध्ये यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. तालुक्यातील सर्व महत्वांच्या तलावामध्ये पाणीपातळी अतिशय कमी झालेली आहे. जर परतीचा पाऊस कमी झाला तर श्रीगोंदा तालुक्यामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होईल.

 श्रीगोंदा तालुक्याच्या बाजुच्या अहमदनगर जिल्हयातील सर्व म्हणजेच पारनेर , कर्जत , नगर व दौंड ( जि.पुणे ) तालुक्यांमध्ये पाऊस चांगला झालेला आहे . तसेच आवर्तनामध्येही पाणी जास्त भेटलेले आहे. सध्या कुकडीचे आवर्तन चालू आहे.

या आवर्तनाध्ये शेतीसाठी पाणी मिळालेले आहे. परंतु कोणत्याही तलावामध्ये पाहिजे इतके पाणी सोडलेले नाही. तरी कुकडीच्या आवर्तनामध्ये पाणी आणि आवर्तन कालावधी वाढवून श्रीगोंदा तालुक्यातील विसापूरसह मोहोरवाडी, लैंडीनाला, सिद्धेश्वर तलाव, लिंपणगाव, ऑटेवाडी, घोडेगाव, भावडी, शेखवस्ती, म्हतारपिंप्री आदी महत्वाच्या तलावांमध्ये पाणी सोडण्यासाठी आदेश द्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post