छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक पतसंस्था करणार चार कोटींचा लाभांश वाटप करणार


नगर ः  छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्था सभासदांना चार कोटी रुपये डिव्हिडंटच्या स्वरूपात वाटप वार्षिक करण्यात येणार आहे. १५ ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर पतसंस्थेच्या इमारत बांधकामचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे पतसंस्थेचे अध्यक्ष सुदामराव बनसोडे यांनी जाहीर केले.

येथील छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी दि.२९ सप्टेंबर रोजी पतसंस्थेचे अध्यक्ष सुदामराव बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाली.

यावेळी ऑनलाईन पद्धतीने झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.सभासदांचे हित व पतसंस्थेचा उत्कर्ष हेच उद्दिष्ट डोळयासमोर ठेऊन सभासदांना चार कोटी रुपये डिव्हिडंटच्या स्वरूपात वाटप करण्याचा निर्धार पतसंस्थेचे अध्यक्ष सुदामराव बनसोडे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.

संस्थेचे व्यवस्थापक यांनी राजेंद्र शेवाळे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. यावेळी आर्थिक मंजुरी अहवाल वाचन झाल्यानंतर त्यास सभासदांच्या आवाजी मतदानाने मंजुरी देण्यात आली.  सभासदांनी आपल्या भावना व्यक्त करून पतसंस्थेने घेतलेल्या सभासदांच्या हितावह निर्णयाचे स्वागत केले.

या वार्षिक सर्वसाधारण सभेला महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष कुंडलिकराव भगत, पतसंस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सुर्वे, मानद सचिव चंद्रकांत तापकीर, संचालक प्रमोद कानडे, सुरेश मंडलिक, दादासाहेब शेळके, सुरेश खरड, प्रशांत सातपुते, सुनीता बर्वे, किशोर जेजुरकर, राजेंद्र बागले, अर्चना कडू, रामदास जाधव, जयराम ठुबे, दादासाहेब डौले, संजय गवळी, बाळासाहेब मेहेत्रे, संजय गि-हे, अरुण गाढवे,  अशोक जगदाळे, सुभाष गोसावी हे संचालक सामाजिक अंतराचे पालन करत उपस्थित होते.

पतसंस्थेचे अध्यक्ष सुदामराव बनसोडे म्हणाले की, संस्थेने आतापर्यंत संचालक मंडळ व सभासदांना विश्वासात घेऊन काम केले आहे. त्यामुळे पतसंस्थेची उत्कर्षाकडे वाटचाल सुरू झाली आहे. सहा टक्के व्याज दराने पतसंस्था सभासदांना कर्ज उपलब्ध करून देत आहे. 

सध्या ५२ कोटी पन्नास लाख इतक्या ठेवी झाल्या असून सन २०२०- २१ या आर्थिक वर्षात ८८ लाख नफा झाला असल्याचे सांगून त्यांनी लवकरच अहमदनगर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन होऊन बांधकामास प्रारंभ करण्यात येणार असल्याचे यावेळी बोलतांना जाहीर केले. 


या प्रसंगी पतसंस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सुर्वे, मानद सचिव चंद्रकांत तापकीर, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष कुंडलिकराव भगत यांनी मनोगत व्यक्त करत सर्व सभासदांना मार्गदर्शन केले. संचालक अशोक जगदाळे यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post