एम. व्ही. देशमुख
नगर ः कांद्याच्या लिलावात 20 ते 23 रुपये किलोपर्यंत भाव मिळत आहे. मात्र किरकोळ बाजारात मात्र 50 रुपयांपर्यंत भाव मिळत असून शेतकऱ्यांच्या पदरी कष्ट करूनही काही मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
कांद्याच्या भावात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्या वाढ झालेली आहे. मात्र ही वाढही सारखी नसून कमी जास्त प्रमाणात होत आहे. सध्या कांद्याला 20 ते 23 रुपये किलोचा भाव मिळत आहे. मात्र किरकोळ बाजारात मात्र कांदा 50 रुपये किलो दराने विक्री होत आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कांदा डबल भावाने विक्री केला जात असल्याचे चित्र सध्या बाजारात दिसून येत आहे.
शेतकऱ्याच्या जीवावर सध्या अनेकजण मोठे होत चालले आहे. हा प्रकार थांबणे गरजेचे आहे. मात्र शेतकऱी त्यांची भूमिका सध्या सोडायला तयार नाही. लिलावापेक्षा शेतकऱ्यानी आपला माल विक्री बाजारात उभे राहून विकला तर त्यांना चांगला पैसा मिळू शकतो. मात्र शेतकऱ्यांकडे वेळ कमी व माणसे कमी असल्यामुळे शक्य होत नाही. मात्र शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला कांद्या सारखा माल तरी स्वतः विक्री बाजारात उभे राहून करणे गरजेचे आहे. तेव्हाच शेतकऱ्यांच्या मालाला किंमत मिळून त्यांच्या पदरात काही पैसे जादा पडू शकतात.
सर्वसामान्यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन बांदावर शेती माला खरेदी केल्यास त्यांनाही दोन पैसे मिळू शकतात. यासाठी आता सर्वांन विचार करणे गरजेचे आहे. शेतकरी व सर्वसामान्यांध्ये सध्या मधला वर्ग श्रीमंत होत चालला आहे. माला योग्य दाम मिळत नाही, म्हणून कष्ट करून शेतकरी तर दाम जास्त देऊन माल खरेदीकरून सर्वसामान्य मरत आहे.
हेच सध्याच्या कांद्याच्या बाजारावरून दिसून येत आहे. लिलाव जरी 23 रुपयेपर्यंत किलोपर्यंत गेले तरी किरकोळ बाजारात मात्र लिलाव चाळीस ते 45 किलोपर्यंत गेल्याचे सांगितले जाते. त्याच नावाखाली सर्वसामान्यांची लूट सध्या सुरु आहे. ही लूट थांबविण्यासाठी सर्वसामान्य ग्राहक व शेतकरी यांच्यातील विचार जुळून शेतकऱयाने बांधावर आलेल्या ग्राहकाला माल द्यावा, तसेच सर्वसामान्यांनी बांधावर जाऊन माल खरेदी करावा, तो करताना भावात घासाघीस करू नये. तरच मधला श्रीमंत होणाऱ्या वर्गाला काही अंशी आळा घालता येणार आहे. नाही तर आहे तीच परिस्थिती कायम राहणार आहे.
Post a Comment