नगर : जिल्ह्यात आज दिवसभरात १९४ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या तीन लाख ४५ हजार ९२८ इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.६९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १६७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता एक हजार १७३ इतकी झाली आहे. कालच्यापेक्षा आज रुग्ण संख्येत सात ने वाढ झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या तपासणी अहवालामध्ये ६३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६७ आणि अँटीजेन चाचणीत ३७ रुग्ण बाधीत आढळले.
श्रीगोंदा तालुक्याने जिल्ह्यात आघाडी घेतली असून दिवसभरात 33 जण बाधित आढळले आहे. नगर शहरात बाधिताचा आकडा आता वाढला असून 17 जणांची नोंद झाली आहे. तिसर्यास्थानी पारनेर तालुका आहे. पारनेरमध्ये 12जण बाधित आढळले आहेत.
Post a Comment