दुबई : यंदाच्या टी20 विश्वचषकात सुरुवातीपासूनच सामने अतिशय चुरशीचे होत आहे. अगदी ग्रुप स्टेजच्या सामन्यांपासून सामने रंगतदार सुरु आहेत. कोणत्याही सामन्यात विजय आणि पराजयाचा निर्णय अवघ्या पाच सेकंदात होत आहे.
पाच सेकंद म्हणजे सामन्यापूर्वी होणाऱ्या नाणेफेकीची पाच सेकंदात सर्व निकाल समजत आहे. सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघ मैदानाती स्थिती व वातावरण पाहून निर्णय घेत आहे.
नाणेफेक जिंकणारा कर्णधार दो निर्णय घेतो. त्यावरून सामन्याचा निकाल स्पष्ट होत आहे. आतापर्यंत सुपर 12 च्या नऊ पैकी आठ सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघ सामना जिंकला आहे. बांगलादेशचा संघ अपवाद ठरला आहे. केवळ बांग्लादेश एक सामना नाणेफेक जिंकूनही पराभूत झाला आहे.
त्यामुळे यंदाच्या टी20 वर्ल्ड कप 2021 च्या सुपर-12 फेरीमध्ये आतापर्यंत एकूण नऊ सामन्यांपैकी आठ सामन्यात कर्णधाराने नाणेफेक जिंकत सामनाही जिंकला आहे. या सर्व सामन्यात कर्णधाराने प्रथम गोलंदाजी घेतल्याने विजय मिळवण्यात संघाला यश आले आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत पाच गडी राखून विजय मिळविला आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकत सहा गडी राखून सामना जिंकला आहे. श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत पाच गडी राखून विजय मिळविला आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत 10 गडी राखून विजय मिळविला आहे.
अफगानिस्तानने नाणेफेक जिंकत 130 धावांनी विजय मिळविला आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत आठ गडी राखून विजय मिळविला आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत पाच गडी राखत विजय मिळविला आहे. नामीबियाने नाणेफेक जिंकत चार गडी राखून विजय मिळविला आहे.बांग्लादेशने नाणेफेक जिंकली तरी पराभव स्वीकारला आहे.
Post a Comment