भारताकडून पाकिस्तानला 152 धावांचे आव्हान...

दुबई :  टी 20मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरू आहे.या सामन्यात भारताने पाकिस्तानला 152 धावांचे आव्हान दिले आहे. 


पाकिस्तानने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. शाहिन आफ्रिदीला पहिल्यांदा गोलंदाजीसाठी उतवण्याचा निर्णय कर्णधाराने घेतला. 

के एल राहुल आणि हिटमॅन रोहित शर्माला शाहिनने बाद केले. 20 षटकांमध्ये भारतीय संघाने 151 धावा केल्या आहेत. पाकिस्तान संघाला भारतीय संघाने 152 धावांचे आव्हान दिले आहे.

के एल राहुलने 3, रोहित शून्य, विराट कोहलीने 49 बॉलमध्ये 57 धावा केल्या. सूर्य कुमार यादवने 8 बॉलच्या मदतीने 11 धावा केल्या आहेत. ऋषभ पंत आणि विराट कोहलीने भारताचा डाव सावरला. 

पंतने 2 चौकार आणि षटकारांच्या मदतीने 30 बॉलमध्ये 39 धावा केल्या. रविंद्र जडेजाने 13 चेंडूमध्ये 13 धावा केल्या. हार्दिक पांड्याने 8 टेंडूवर 11 धावा केल्या आणि तोही तंबूत परतला. विराट कोहलीला  शाहिनने बाद केले. 

भारतीय संघातील गोलंदाजांना आता आपलं कौशल्य दाखवण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानच्या फलंदाजांना रोखण्यासाठी भारतीय संघाला रणनिती आखावी लागणार आहे.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post