मंत्रीमहोदयांनी सांगितले...विना अट आपले स्वागत....

नगर : सध्या राजकीय क्षेत्रात बदलाचे वारे वाहत असून अनेकजण एका पक्षातून दुसर्या पक्षात प्रवेश करीत आहेत. काहीजण स्वत:हून तर काहींना विविध प्रलोभने देऊन आकर्षित केले जात आहे. या प्रवेशाअगोदर काही गुप्त बैठका होत आहेत. 


अशाच एका माजी आमदाराने पक्ष प्रवेशासाठी एका मंत्री महोदयांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र अट टाकल्याने त्यांना विना अट येत असाल तर स्वागत आहे, असे मंत्री महोदयांनी सांगितल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

विधान परिषद निवडणूक जशी जवळ येत आहे. तशा राजकीय हालचाली गतीमान होत चालल्या आहेत.  नुकतीच विरोधी गटातील एका माजी आमदार व सत्ताधारी गटातील एका आमदारासह मंत्री महेदयांमध्ये प्रदीर्घ चर्चा रंगली आहे.

मंत्रीमहोदयांबरोबर बंद दाराआड काय चर्चा झाली याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. ही चर्चा प्रवेशासंदर्भात होती. मात्र त्या माजी आमदरांनी पक्ष प्रवेश करण्याचीही इच्छा व्यक्त केली. त्या मान्य असतील तर प्रवेश करतो असे सांगितले. 

त्यावर विद्यमान आमदारांनी मंत्री महोदय व माजी आमदार यांच्यात तडजोड करण्याचा प्रयत्न केला. परंतु मंत्री महोदय पक्ष प्रवेश होईल पण विना अटच होईल. अटी ठेऊन कोणालाच पक्ष प्रवेश देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट सांगितले, असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 

या बाबीत सर्वांनी गुप्तता पाळली असली तरी रात्री उशिरा झालेल्या व बंद दाराआड झालेल्या चर्चेचा मात्र जिल्हाभर गवगवा झालेला आहे. आता ते प्रवेश करतात की आहे तेथेच राहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांचा प्रवेश झाला तर राष्ट्रवादीला विधा परिषदेची निवडणूक जिंकणे तसे सोपे जाणार आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post