नगर : चोरीच्या मोबाइलमध्ये सीमकार्ड टाकण्याची चोरांची छोटीशी चूक महागात पडल्याने नेवासे पोलिसांना रात्रीच्या वेळी महामार्गावरील वाहनचालकांना लुटणारी टोळी जेरबंद केली. या गुन्हेगारांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
१५ जुलै २०२१ रोजी अमरावती येथील डॉ. सतीश विधळे परिवारासह पुण्याकडे जात असताना त्यांची कार प्रवरासंगमजवळ पंक्चर झाली. ते रस्त्याच्या कडेला कारचे चाक बदलत होते.
त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील दहा हजार रुपये रोख रक्कम, तीन मोबाइल व सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले होते.
या घटनेचा तपास करताना पोलिस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांनी सायबर क्राईम पथकाच्या मदतीने तपास केला. त्यातून सचिन ठकसेन काळे व राहुल बाळू खिलारे (रा. वाळूंज) या दोघांना अटक केली. सचिनेवर चोरी लुटमारीचे १६ गुन्हे दाखल आहेत.
Post a Comment