नगर : शहरामध्ये शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास विजेच्या प्रचंड कडकडाटासह तुफान पाऊवसाला सुरवात झाली. वादळी वारे आणि पावसाचे रौद्ररुप पाहिला मिळाले. अचानक झालेल्या या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले असल्याचे चित्र होते. तर अनेक रस्त्यावर खड्डयांमध्ये पाणी साचल्याचे दिसत होते.
गांधी मैदान, दिल्लीगेट, माळीवाडा वेस, रंगारगल्ली, नालेगाव आदी सखल भागामध्ये पाणीच पाणी साचल्याने नागरीकांना वाहने चालवण्यास अडचण निर्माण झाली होती. शहरातील सखल भागात पाण्याचा जोर इतका होता की, दुचाकीस्वारांना दुचाकी पुढे नेणे जिकरीचे जात होते. गांधी मैदान येथेतर पाण्याचा वेग पाहता अनेकांनी वाहने इतरत्र लावुन पावसात जाण्याचे टाळले.
शहरासह शहरालगतच्या केडगाव, सावेडी आदी भागमध्ये देखील पावसाने जोरदार हजेरी लावली. परतीचा पावसाची शक्यता कमी वर्तवली असली तरी ऑक्टोबर हिटच्या काळात आलेल्या पावसाने सर्वांची धावपळ उडवुन दिली. विजांचा कडकडाट आणि जोरदार वार्याने सर्व काही विस्कळीत झाले होते.
दुपारी साडेतीनच्या सुमारास वीज विकरण कंपनीच्या सोनेवाडी येथील 132 के.व्ही.वीज उपकेंद्रात वादळी वारे आणि जोरदार पावसामुळे तांत्रिक बिघाड झाला. यानंतर कर्मचार्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. लवकरच विज सुरळीत करण्यासाठी वीज कंपनी काम करत असल्याचे सांगण्यात आले..
Post a Comment