पारनेर : पतीने पत्नीचा खून करून घटनास्थळावरून पळ काढल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना पारनेर तालुक्यातील जामगाव येथे घडली आहे. हे कुटुंब रायगड जिल्ह्यातील असून मजुरीच्या कामानिमित्त ते पारनेर तालुक्यातील जामगाव येथे आले होते.
या घटनेतील मृत महिलेचे नाव शेवंता मच्छू नाईक (वय 45 वर्ष रा. नागदारी ता. अलिबाग जिल्हा रायगड) असे आहे. ती व तिचा नवरा मच्छू नाईक हे महिनाभरापासून जामगांव येथे बाहेरील एका ठेकेदाराकडे काम करत होते.
रविवारी सकाळी नेहमी प्रमाणे त्यांच्या सोबत काम करणारे मजूर कामावर झाडे तोडायला निघाले असता मृत महिला शेवंता व तिचा पती मच्छू लवकर उठले नाही, म्हणून त्यांच्या सोबत काम करणारे कामाला सकाळी सहा वाजता निघून गेले. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास जेवणं करायला घराकडे सगळे कामगार आले.
नाईक अजून कामावर का आला नाही व कामावरून पळून गेला की काय याची खात्री करायला त्याच्या राहत्या झोपडीत जाऊन पाहिले असता शेवंता मृत अवस्थेत दिसून आली. तिचा नवरा मात्र दिसून आला नाही.
त्यानंतर काहींच्या मते तो पहाटे पाच वाजेपर्यंत होता. पाचनंतरच तो पळून गेला अशी असे संबंधितांकडून सांगण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. परंतु आरोपीने पालन केलेले होते. या प्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
Post a Comment