नगर ः नगर अर्बन बॅंकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परंतु बॅंकेचे अस्तित्व टिकविण्यासाठी आता तज्ज्ञ संचालक असणे गरजेचे महत्वाचे ठरणार आहे. बॅकेच्या निवडणुकीत निवडून येणाऱ्या संचालकांना बॅंक वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहे. त्यामुळे विरोधकांसह आता गांधी गटालाही निवडणुकीत संचालक उभे करताना बॅंक क्षेत्रातील तज्ज्ञांची निवड करावी लागणार आहे. यामध्ये सभासद मतदारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
नगर अर्बन बॅंकेची स्थापना 1910 झालेली आहे. तेव्हापासून बॅंकेचा कारभार सुरळीत सुरु होता. बॅंकेच्या इतिहासात एकदाही बॅंकेवर प्रशासकाची नियुक्ती झालेली नाही. मात्र दुर्दैवाने बॅंकेच्या संचालक मंडळाकडून कारभार चुकला. क्रेडिट सोसायटीला कर्ज देण्यात आले. हे कर्ज वाटप करू नये, अशा सूचना असतानाही त्याचे पालन केले. त्यामुळे बॅंकेचा एनपीए वाढत गेला. तो सध्याही वाढलेला असल्याचे विरोधकांमधून बोलले जात आहे.
बॅंकेने वाटप केलेल्या कर्जाची अद्यापही वसुली झालेली नाही. ती होण्यासाठी आता सर्वांना प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच बॅंकेची समाजात गेलेली प्रतिमा पुन्हा उंचविण्यासाठी आता सर्वांनाच प्रयत्न करणे गरजेचे आहे.
बॅंकेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे गांधी गटासह विरोधकांनी बॅंकेच्या निवडणुकीत उतरण्याच्या हालचाली सुरु केलेल्या आहेत. मात्र सत्तेसाठी ही निवडणूक न लढता आता सर्वांनी बॅंक वाचविण्यासाठी लढणे गरजेचे आहे. तरच बॅंक टिकणार आहे.
या निवडणुकीत आता दोन्ही गटाने बॅंक क्षेत्रात तज्ज्ञ असलेल्या व्यक्तींना निवडणुकीच्या आखड्यात उतरवून बॅंक वाचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. बॅंकेच्या अस्तित्वासाठी सर्वांनी एकमेकातील मतभेत विसरून बॅंकेच्या पूर्नअवस्थेत आणण्यासाठी आता सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एक विचाराने संचालक मंडळ ठरवून बॅंकेची निवडणूक बिनविरोेध करून त्यावर संचालक मंडळाची नियुक्ती करणे गरजेचे आहे.
एकमेकातील वाद बॅंकेसाठी बाजुला ठेऊन बॅंक कशी वाढेल व झालेल्या चुकीच्या कारभारातून बाहेर पडले, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी आता सर्वांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा सभासद मतदारांमधून व्यक्त होत आहे.
Post a Comment