बँक दरोड्यात पारनेर तालुक्यातील आरोपींचा हात... मोहरक्याला निघोजमधून अटक

पुणे :  शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 21 ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास 5 जणांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. यामध्ये पारनेर तालुक्यातील आरोपींचा सहभाग स्पष्ट झाला आहे. टोळीच्या मोहरक्याला पारनेर तालुक्यातील निघोज येथून अटक करण्यात आली.


शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 21 ऑक्टोबरला दुपारी सव्वा एकच्या सुमारास 5 जणांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. 

दरोडेखोरांनी कॅशियर, बँकेच्या कर्मचारी व हजर असलेल्या ग्राहकांना पिस्तुलाचा धाक दाखवून बँकेतील 32 लाख 52 हजार 560 रुपयांची रोकड आणि 2 कोटी 47 लाख 20 हजार 390 रुपये किंमतीचे 824 तोळे सोने असा एकूण 2 कोटी 79 लाख 72 हजार 950 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. 

या गुन्ह्यातील आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने  बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली होती.

डॉलर उर्फ प्रविण सिताराम ओव्हळ (वय-29 रा. वाळद, ता. खेड), अंकुश महादेव पाबळे (वय-24 रा. कावळपिंपरी, ता. जुन्नर), धोंडीबा महादु जाधव (वय-29 रा. निघोज कुंड, ता. पारनेर, जि. नगर), आदिनाथ मच्छिंद्र पठारे (वय-25 रा. पठारवाडी, ता. पारनेर), विकास सुरेश गुंजाळ (वय-20 रा. टाकळी हाजी, ता. शिरुर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

डॉलर उर्फ प्रविण ओव्हाळ हा टोळी प्रमुख असून त्याला पारनेर तालुक्यातील निघोज येथून अटक केली. आरोपींकडून 2 कोटी 19 लाख 15 हजार 370 रुपये किंमतीचे 7 किलो 32 तोळे दागिने आणि 18 लाख 27 हजार 590 रुपये रोख असा एकूण 2 कोटी 36 लाख 42 हजार 960 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त  केला आहे.

बँकेवर दरोडा टाकण्यासाठी तीन महिन्यांपासून तयारी केली होती. त्यासाठी टोळी प्रमुख ओव्हाळ याने मध्यप्रदेशातून तीन पिस्टल आणल्या होत्या. तसेच गुन्हा करण्यासाठी दोन वाहनांचा वापर करण्यात आला. 

त्यापैकी मॅटेलीक ग्रे रंगाची सियाज कार (एमएच 05 सीएम 1293) गुन्ह्यात वापरण्यासाठी तिचा रंग पांढरा करुन घेतला. गुन्हा केल्यानंतर पुन्हा रंग बदल्यासाठी मध्यप्रदेश येथे नेऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले. 

दरोडा टाकल्यानंतर पोलिसांना चकवा देण्यासाठी सियाज गाडीमधील मुद्देमाल बोलेनो (एमएच 14 एसएम 0707) मध्ये टाकून लंपास केला. परंतु पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post