बॅकांवर दरोडेखोरांची नजर... दहा दिवसात राज्यातील चार बॅंका फोडल्या... एका दरोड्याचा उलगडा...

मुंबई ः दहा दिवस एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल चार बॅंकांर दरोडे पडले असून चोरट्यांनी मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले असून एका घटनेचा तपास लावण्यात पोलिसाना यश आलेले आहे. उर्वरित तीन दरोड्यांचा तपास सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील दरोड्यात पकडण्यात आलेल्या आरोपींचा सहभाग इतर दरोड्यात आहे का याचा तपास पोलिस करीत आहेत. 


दरोड्याची पहिली घटना ही पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे महाराष्ट्र बँकेत 21 ऑक्टोबरला दरोड्याची घटना घडली होती. पिंपरखेड येथे भर दिवसा दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. 

दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत बँकेतील 31 लाख रुपये रोकड तसेच 2 कोटी रुपयांचे सोने पळवून नेले होते. या दरोड्याचा पोलिसांनी तपास सावलेला असून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यात नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील दरोडेखोरांचा समावेश आहे. 

बँकेवरील दरोड्याची दुसरी घटना ही जालना जिल्ह्यातून समोर आली होती. जालनाच्या अंबड तालुक्यातील शहागड येथे बुलडाणा अर्बन बँकेवर भर दिवसा सशस्त्र दरोडा पडला होता. आरोपींनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत बँकेतील पैसे आणि लॉकरमधील दागिने लंपास केले होते. 

संबंधित घटना ही 28 ऑक्टोबरला दुपारच्या सुमारास घडली होती. तीन बंदूकधारे बँकेत शिरले. त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत 25 लाख रुपये आणि मोठ्या प्रमाणावर लॉकरमधील सोने लंपास केले. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

तिसरी घटना ही काल (29 ऑक्टोबर) सोलापुरात घडली. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेवर मध्यरात्री सशस्त्र दरोडा पडला. यामध्ये सात लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. गॅस कटरच्या सहाय्याने दरवाजा तोडून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. अज्ञात आरोपींचा शोध सुरु आहे. चौथी घटना ही आज सकाळी बुलडाण्यात स्टेट बँकेत घडली आहे. येथून दरोडेखोरांनी हजारो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. 

राज्यात दहा दिवसात तब्बल चार दरोड्याच्या घटना घडल्याने बॅंकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. बॅंकाच जर सुरशित नसतील तर इतरांची काय अवस्था आहे, असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post