पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर दोघांना सशस्त्र मारहाण..

बीड : दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघा भावंडांवर तलवार, लोखंडी रॉडने पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील रस्त्यावर हल्ला केल्याची  घटना ९ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली. 

दोघा जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेताच हल्लेखोर पळून गेले. त्यांची दुचाकी पोलिसांनी  जप्त केली आहे. खान बंधू ( दोघे रा. शहेंशाहवली दर्गा, पेठ बीड ) अशी झालेले आहेत. 


बीड पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरून  रात्री साडेनऊ वाजता खान बंधू जात होते. यावेळी दोन दुचाकींवरून आलेल्या चार ते पाच जणांनी त्यांना पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील एका हॉटेलपुढे अडवून तलवार व रॉडने मारहाण केली. यात दोघे गंभीर जखमी झाले. 

या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर  पोलिसांनी धाव घेतली. मात्र, दुचाकी तेथे सोडून हल्लेखोरांनी पलायन केले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी हल्लेखोरांची दुचाकी जप्त केली आहे. 

खान बंधू यांच्यावर हल्ला का झाला हे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.  या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post