स्थानिक स्वराज्य संस्थेतील त्यांच्या कारभारावर नाराजी... पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी... आगामी काळात अडचणी...

नगर : पक्षाने मोठा विश्वास टाकून त्यांच्या हाती स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार दिला होता. हा कारभार करताना त्यांच्याकडून काही चुका झालेल्या असून अद्यापही होत आहे. त्यांच्या या कारभारावर पक्षातील काहींनी थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या आगामी काळात अडचणी वाढल्या आहेत.


स्थानिक स्वराज्य संस्था कोणतीही हो त्यावर पक्ष श्रेष्ठी आपल्या विश्वासातील व्यक्तीची निवड व्हावी, यासाठी प्रयत्न करत असतात. त्यासाठी मग तसे डावपेच टाकून काही वेळा पक्षांतर्गत नाराजी करून पदे देऊन पक्ष संघटन मजबुत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या पदांच्या माध्यमातून संबंधिताने त्या भागातील विकास कामे करून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. हाच ते पद देण्याचा पक्षाचा हेतू असतो. 

या हेतूलाच जिल्ह्यातील एका स्थानिक स्वराज्य संस्थेत हरताळ फासून फक्त स्वहित पाहण्यात येत आहे. यामुळे स्वपक्षातील नेते व कार्यकर्ते त्यामुळे संतप्त झालेले आहेत. काहींनी पक्ष श्रेष्ठींची भेट घेऊन सर्व वस्तुस्थिती विषद केलेली असून तक्रारींचा पाढा वाचला आहे. 

या संबंधितांच्या कारभारावर आता पक्षश्रेष्ठी नाराज झालेले आहेत. त्यांनी आपली नाराजी बोलून दाखविलेली नसली तरी त्यांच्याकडे थोडे दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे. आपली चूक मात्र अद्यापही त्यांच्या निदर्शनास आलेला नसल्याचे त्यांच्या वागण्यावरून दिसून येत आहे.

परिणामी संबंधितांच्या आगामी राजकीय वाटचालीत आता या त्यांच्या वागणुकीचा अडथळा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षांतर्गत नाराजी त्यांना मात्र चांगलीच महागात पडणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post