पती-पत्नीतील वादाला संवाद नसण्याने अन् अहंकार भाव हीच प्रमुख कारणे...

पती -पत्नीच्या नातेसंबंधात संवाद नसणे व अहंकार अशी भावना हीच कारणे वादाला कारणीभूत ठरत आहेत. या नात्यात या दोन गोष्टींना थारा असू नये. या गोष्टी नसल्या तर  वैवाहिक जीवनात गोडवा येतो. पण या दोन गोष्टींचा जीवनात समावेश झाला तर दुरावा येतो.


पती-पत्नीमधील नाते हे सर्वात मजबूत नाते समजले जाते. या नात्याची प्रतिष्ठा अन् गोडवा कधीही कमी होऊ देऊ नये. हे टिकण्यासाठी दोघांनाही तितकेच प्रयत्न करावे लागतात. यामध्ये एकाचे प्रयत्न कमी पडले तर घरात वादाचे पडसाद लगेच उमटू लागतात.

पती-पत्नीत विश्वासाची कमतरतेमुळे हे नाते कमकुवत होते. त्यामुळे पती-पत्नीने कधीच एकमेकांचा गमावू नये. विश्वास गमावला की तुम्ही कितीही काही एकमेकांसाठी केलेले असेल तर त्यावर पाणी फेरले जाते. या पती-पत्नीच्या नात्यात विश्वासाची कमतरतेमुळे वैवाहिक जीवनात अडचणी येऊ लागतात. 

त्याचे पडसाद हळूहळू संसारावर पडू लागतात. तणाव अन् कलह देखील होतो. म्हणूनच पती-पत्नीने विश्वास कधीही गमावू नये. संसार करताना एकमेकांना आदर अन् सन्मान दोघांनीही राखणे गरजेचे आहे. या नात्यात एकमेकांच्या कमकुवतपणा उघड करण्याऐवजी त्या दूर करून एकमेकांची ताकद बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

एकमेकांच्या मनाला उभारी देणार्या गोष्टी करणे गरजेचे आहे. ज्या गोष्टीवरून नेहमीच वाद होतात. त्या टाळणे गरजेचे आहे. मला काही स्वातंत्र्य हवे नको का? माझे जीवन कधी जगणार असे जेव्हा वाक्य निघतात. 

तेव्हा ते नाते संपलेले असते. असे नाते अल्पकाळासाठी असते. हे नातं असं आहे एकमेकांच्या मनाजोग्या व एकमेकांच्या कलाने जीवनाचा मार्ग करणारे आहे. आपला आनंद पाहून जीवनसाथीला दुखात लोटणारी घटना टाळणे गरजेचे आहे.

पती-पत्नीचे नाते मजबूत करण्यासाठी कधीही संवादाच्या अभावाची परिस्थिती उद्भवू देऊ नये. एकमेकांमधील संवाद कमी झाल्याने अनेक संसार मोडलेले आहेत. महत्त्वाच्या बाबींवर पती -पत्नीने एकत्र निर्णय घेणे गरजेचे आहे. या नात्यातील सर्व प्रसंग एकमेकांशीत चर्चा करणे गरजेचे आहे. 

मात्र काहींना दोघीतील भांडण मित्र-मैत्रीणींना सेर करून त्यावर चर्चा करून मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातून चांगलेच मार्गदर्शन होते असे नाही. अनेकदा चुकीचा मार्गही दाखवला जातो. प्रत्येक नात्यात प्रतिष्ठा असते. ही गोष्ट कधीही विसरता कामा नये. 

बोलण्यातला गोडवा अन् स्वभावातील नम्रता हेही नाते सुधारण्यास मदत करतात.  स्वभावात नेहमीच नम्रता ठेवणे गरजेचे आहे. त्याचे अनुकरण करावे. फक्त देखाव्या पुरती नम्रता नसावी.

पती-पत्नीच्या नात्यात खोटे बोलणे, फसवणूक आणि चुकीचे आचरणामुळे वितुष्ट येते. या बाबी पती-पत्नीच्या नात्यात पटकन उघड होऊन नातं तुटण्याची शक्यता दाट असते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post