महिलांच्या स्पर्धात पुरुषांची लुडबूड कशासाठी....

नगर : सध्या सण उत्सवाचा कालावधी सुरु आहे. या दरम्यान आता अनेकजण महिलांसह विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आयोजित करीत आहे. या स्पर्धा आयोजन करताना संबंधित घटकाशी निगडीत असलेल्यांचा त्यात समावेश नसतो. 

मागील वर्षीही काही स्पर्धांमध्ये गोंधळ झाला होता. त्याची पुर्रावृत्ती यंदाही झाल्याची चर्चा स्पर्धकांमधून होत आहे. महिलांच्या स्पर्धेत स्पर्धकांच्या प्रवेशिका संकलनासाठी व आयोजनासाठी पुरुषच का ठेवले जात आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कोरोना काळात अनेक संस्था, संघटना व इतरांनी ऑनलाइन स्पर्धा घेऊ सर्वसामान्यांचे कोरोनाच्या काळात मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला. त्याचा अनेक ठिकाणी चांगला परिणामही दिसून आला.

पण काही संधी साधूंनी याच संधीचा फायदा उठवत या स्पर्धांतून पैसे कमविण्याचा उद्योग केला. त्याचा अनेकांना आर्थिक फटका बसलेला आहे.

काहींनी या स्पर्धाच्या निमित्ताने सहभागी आलेल्या महिला व पुरुषांना वारंवार दुरध्वनी करून त्रास देण्याच्या घटना काही ठिकाणी घडलेल्या आहेत. 

याबाबत अनेकांनी तक्रारी संबंधित स्पर्धा आयोजकांकडेही केल्या. मात्र अशाच संधी साधूंनी पुन्हा स्पर्धेच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यामुळे स्पर्धांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

महिलांसाठी स्पर्धा आयोजित केल्यानंतर त्या स्पर्धेचे सर्व संकलन महिलांकडे असणे गरजेचे आहे. मात्र अनेक स्पर्धा आयोजक स्पर्धेत सहभागी होणार्या स्पर्धेचे संकलन पुरुष पदाधिकार्यांकडे देत आहे. 

याचा मागील काही स्पर्धेत अनेकांना वाईट अनुभव आलेला आहे. त्यामुळे या पुढे अशा स्पर्धा ठरविताना महिलांच्या स्पर्धेत महिलांनाच आयोजकासह संकलनासाठी नियुक्त करावे, अशी मागणी होत आहे.

एका स्पर्धेतील स्पर्धकांना समाज माध्यमावर शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. मात्र त्या स्पर्धेत आयोजकातील एकाने आपण दिलेलीच प्रतिक्रिया इतर स्पर्धक महिलांनी तिच द्यावी, म्हणून दबाव तंत्राचा वापर केल्याची चर्चा सध्या सुरु आहे.त्यामुळे यापुढे महिलांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये महिलांच्या सहभाग ठेवावा, अशी मागणी होत आहे.


महिलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धांचे आयोजन करणे चांगले आहे. मात्र हे करताना महिलांना या स्पर्धा आयोजनासह स्पर्धक महिलांच्या प्रवेशिका स्वीकारणे व पुरस्कार्थी निवडणे व बक्षीसे वाटप करण्याची जबाबदारी का दिली जात नाही, असा सवालही आता उपस्थित केला जात आहे. 

नुकत्याच काही स्पर्धा पार पडलेल्या असून त्यात प्रवेशिका स्वीकारल्यापासून ते निकाल जाहीर करेपर्यंतची सर्व जबाबदारी पुरुषांवर सोपविण्यात आलेली आहे. आम्ही समाजासाठी खूप काही करतो असे भासवून नको ते उद्योग करणार्यांच्या हाती स्पर्धा देऊ नये, असे मत आता महिलांमधून व्यक्त होत आहे.

स्पर्धा महिलांसाठी आहे तर महिलांनाच त्या स्पर्धांची जबाबदारी देऊन पुरुषांची लुडबूड थांबविण्याची मागणी होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post