कोरोना नियमांचे पालन न करणार्या सहा दुकाने सील...

नगर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. यातच सण उत्सवाचा काळ सुरु असल्याने गर्दीच्या अनुषंगाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहे. यातच नुकतेच जिल्हाधिकार्‍यांनी पाथर्डी तालुक्यात भेट देत नियमांचे उल्लंघन करणार्‍या काही दुकानावर कारवाई केली आहे.


या दुकानांवर कारवाईचा बडगा अजंठा चौकातील व्दारका मेडिकल, चंदन मेडिकल, पटवा किराणा, उपजिल्हा रुग्णालय समोरील रविराज भोजनालय, जगदंबा सलून, तारकेश्‍वर कृषी सेवा केंद्र या सहा दुकानांमध्ये कोरोना नियम पाळण्यात न आल्याने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी धडक कारवाई करत दुकाने सील करण्याचे आदेश पाथर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना दिले.

दरम्यान ही दुकाने सात दिवसांसाठी सील करण्याची कारवाई केली. या कारवाईमुळे शहरातील व्यापार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील हे मोहटादेवी गडावर बैठकीसाठी जात असताना पाथर्डी शहरात त्यांना काही दुकानांत करोना नियमांची पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास आले. 

स्वतः या अधिकार्यांनी रस्त्यावर उतरुन दुकानांची पाहणी केली त्यानंतर हि कारवाई करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post