पाथर्डी : जिल्हा प्रशासनाने मोहटादेवी दर्शनासाठी भाविकांच्या संख्येचा विचार करता दर्शनासाठीच्या संख्येमध्ये किमान दुपटीने वाढ करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त करत एस.टी.बसेसला किमान भक्त निवासापर्यंत जाण्याची परवानगी द्यावी अशी सूचना खासदार डॉ.सुजय विखे यांनी स्थानिक पोलिसांना केली.
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त खासदार डॉ.सुजय विखे यांनी सपत्नीक मोहटादेवीचे दर्शन घेतले. देवस्थान समितीतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी स्वागत केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, अजय रक्ताटे, ॲड. प्रतिक खेडकर, माजी उपनगराध्यक्ष बंडू बोरुडे आदी यावेळी उपस्थित होते.
यात्रा कालावधीत सामुहिक आरती बंद असल्याने खासदार विखे यांनी केवळ पूजा केली. दर्शन रांगेतील भाविकांनी खासदार डॉ. विखे यांचेकडे तक्रारींचा पाढा वाचला.कोरोनाच्या नावाखाली नियमांचा अतिरेक झाला आहे. ऑनलाइन दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहने तीन किलोमीटर लांब अंतरावर ठेवावी लागतात.
खाजगी वाहने मात्र मन मानेल त्या पद्धतीने दर आकारून भाविकांची अडवणूक करतात.त्यामध्ये कोणीही कोरोना चे नियम पाळत नाहीत.मेंढरा सारखी माणसे भरून जाताना पोलीस अडवत नाहीत.
एसटी बसला मात्र विविध अडथळे आहेत.देवस्थान समितीची एक बस पुरत नाही. आरतीसाठी वाद्य व माईकला परवानगी मिळावी अशी मागणी भाविकांनी केली.
यासह विविध मागण्या भाविकांच्या ऐकून खासदार डॉ.विखे यांनी पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांना एसटी बसेस भक्तनिवास पर्यंत सोडून भाविकांची सोय करावी. भाविकांच्या वाढीव संख्येबाबत जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बोलणे करून वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली जाईल.
अनेक दिवसानंतर मंदिरे उघडल्याने भाविकांची दर्शन घेण्याची लगबग सुरू आहे.पावसाचे दिवस असल्याने ड्युटीवरील पोलिसांसाठी प्रवरा समुहाच्या वतीने वॉटरप्रुफ तंबू तात्पुरत्या स्वरूपात त्वरित देण्याचे खासदार डॉ. विखे यांनी मान्य केले.
Post a Comment