वडनेर : नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानतर्फे शहादू शिवाजी वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साहित्य क्षेत्रातील काही साहित्य कलाकृतीना पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. त्याकरिता प्रतिष्ठानतर्फे राज्यातील कवी, लेखक यांच्याकडून प्रकाशित साहित्य कलाकृती मागविल्या आहेत. प्रतिष्ठानच्या आवाहनास राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 70 प्रस्ताव दाखल झालेले आहेत.
येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील कवी, लेखक शहादू शिवाजी वाघ यांचे ०४ जून २०२१ ला अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाचे तीन जून 2022 औचित्य साधून त्यांच्या लिखाणाचा संग्रह करून एक स्मरणिका पुस्तक रुपाने प्रकाशित करणार आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साहित्य क्षेत्रातील काही साहित्य कलाकृतीना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क घेतले जाणार नाही. साहित्यिकांना व्हाट्सअपच्या माध्यमातून निकाल कळविला जाईल. शहादू वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच पुरस्कारासाठी साहित्य कलाकृती पाठविणा-या सर्व सहभागी साहित्यिकांना प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
त्याकरिता प्रत्येक साहित्यिकांनी जानेवारी २०२० ते ३१ मे २०२१ पर्यंत प्रकाशित झालेल्या आपल्या साहित्याच्या कोणत्याही एका साहित्य प्रकारातील दोन प्रती फक्त रजिस्टर पोस्टाने अथवा स्पीड पोस्टाने पुढील पत्त्यावर १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात.
राज्यभरातील नामवंत साहित्यिकांनी आपले प्रस्ताव पाठविलेले आहेत. यामध्ये पुणे, ठाणे, जळगाव, मुंबई, अहमदनगर, नाशिक, उस्मानाबाद, लातूर, परभणी आदी जिल्ह्यातून प्रस्ताव आलेले आहेत.
पत्ता : संजय शहादू वाघ, पिंपळगाव जलाल, ता.येवला, जि. नाशिक- पिन-४२३४०१ संपर्क- ९०२११२२८८७ साहित्य कलाकृती पाठविल्यानंतर ७७७३९२५००० या क्रमांकावर पावतीचा फोटो पाठवावा असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय वाघ यांनी केले आहे.
पुरस्कार आणि पुरस्काराचे स्वरुप
कादंबरी : प्रथम पुरस्कार - रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, शाल पुष्पगुच्छ.
कवितासंग्रह : प्रथम पुरस्कार : रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, पुष्पगुच्छ. कथासंग्रह : प्रथम पुरस्कार : रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, पुष्पगुच्छ.
गझलसंग्रह : प्रथम पुरस्कार : रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, पुष्पगुच्छ.
Post a Comment